rat३०p३०.jpg-
P२४N०८१७७
उदय सामंत
-------------
उदय सामंतांच्या कार्यअहवालाचे आज प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या ५ वर्षामध्ये केलेल्या विकासाचा लेखाजोखा मांडणारा उदय पर्व, कार्यअहवाल प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. ३१) सकाळी ११ वा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मानवतावादी विचारवंत रघुनाथ माशेलकर, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यअहवालाचे प्रकाशन होणार आहे.
उद्योगमंत्री सामंत यांची राजकीय कारकीर्द लक्षात राहणारी ठरली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदार संघ आणि जिल्ह्यात विकास आणला आहे. कोकणातील जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध, अविरत काम करण्याची ताकद या गुणांवर त्यांनी कोकणाचा चेहरामोहरा बदलला. कर्तृत्वाने मिळालेल्या प्रत्येक पदाचे त्यांनी सोने करून महाराष्ट्राला नाही तर देशाबाहेर आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांच्या २०१९ ते २०२४ या काळातील कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळा शनिवारी होणार आहे.
रत्नागिरी शहराचा तालुक्याचा आणि जिल्ह्याचा पर्यटन विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवले. त्यापैकी अनेक कामे सुरू आहेत. रत्नागिरी शहर हे शैक्षणिक हब करण्यात उदय सामंत यांना यश आले आहे. प्रशासकीय इमारतींमुळे प्रशासनाची प्रतिमा उंचावण्याचे काम त्यांनी केले. सुसज्ज पोलिस यंत्रणा, महिला सक्षमीकरण, परिवहन मंडळ विकास, क्रीडा विकास, मच्छीमार बंदर विकास, विविध रस्ते, ग्रामीण विकासाची कामे त्यांनी केली आहेत. रत्नागिरीतही उद्योग आणले असून, अनेक कंपन्यांशी त्यांनी करार केल्यामुळे उद्योगक्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडणार असून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देण्याचे काम उदय सामंत यांनी केले. उदय सामंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील सामंत यांनी अनेक आरोग्य आणि सामाजिक कामे केली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.