कणकवलीत प्रौढाची आत्महत्या
कणकवली : शहरातील पटकीदेवी मंदिरालगतचे रहिवासी गणेश प्रभाकर मोहोरकर (वय ४८) यांनी आज राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्यांचा मुलगा गंधर्व मोहोरकर (वय १९) याने कणकवली पोलिसांत फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, मृत गणेश मोहोरकर जेवण झाल्यानंतर खोलीत झोपण्यासाठी गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांचा मुलगा त्या खोलीत गेला असता, त्याला छपराच्या अँगलला नायलॉन दोरीने गळफास लावलेला गणेश मोहोरकर यांचा मृतदेह दिसून आला. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.