अरबी समुद्रात ‘असनी’चा झंझावत
चक्रीवादळाची निर्मिती ः कोकण किनाऱ्यावर वादळी वाऱ्यांची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३० ः अरबी समुद्रात असनी चक्रीवादळाची निर्मिती झाली असून या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नसला तरी कोकण किनारपट्टीला ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे.
गुजरात आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर एकाच वेळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘असनी’ चक्रीवादळात रूपांतर झाले असून ते गुजरात किनारपट्टीकडून ओमानकडे सरकत आहे. त्यामुळे या वादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. या चक्रीवादळाचा राज्याला धोका नसला तरी समुद्रातील वातावरण खडबडीत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. ३० ऑगस्ट ते १ ऑगस्ट या कालावधीत कोकण किनारपट्टीला ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. याचा प्रभाव अन्यत्र जाणवणार नसल्याचेही हवामान विभागाकडून स्पष्ट केले आहे. मात्र, समुद्रात वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
------------------
जिल्ह्यात सोमवारी आॅरेंज अलर्ट
सिंधुदुर्गात सध्या पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्य सरी कोसळत आहेत. पुढील एक दोन दिवस तीच स्थिती राहणार आहे. मात्र, २ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
--------------------
वैभववाडीत जोरदार सरी
वैभववाडी तालुक्यात आज सकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिली. उर्वरित जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या सरी झाल्या. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. काही भागात ऊन होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.