कोकण

नीतेश राणेंच्या दबावातूनच आपटेला ‘राजकोट’चे काम

CD

08202

नीतेश राणेंच्या दबावातूनच
आपटेला ‘राजकोट’चे काम

पारकर ः हितसंबंधांची चौकशी करा

कणकवली, ता.३० : राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि आमदार नीतेश राणे यांचे जुने संबंध आहेत. त्यातूनच आपटे याला राजकोटच्या पुतळ्याचे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. राणे आणि आपटे यांच्या संबंधाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे.
श्री.पारकर म्हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वी याच जयदीप आपटे याने बनविलेला अप्पासाहेब पटवर्धन यांचा पूर्णाकृती पुतळा कणकवली नगरपंचायतीला नीतेश राणे यांच्याकडून देण्यात आला. कोकणात पुतळा बसवण्याच्या कामात आपटे याचा तो चंचुप्रवेश होता. त्यावेळचे नीतेश राणे आणि जयदीप आपटे यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जुन्या संबंधांतूनच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे आव्हानात्मक काम आपटेला दिल्याची शक्यता पारकर यांनी व्यक्त केली आहे.’’
पारकर म्‍हणाले, ‘‘अप्पासाहेब पटवर्धन यांचा तो पुतळाही आपटे याची ट्रायल होती आणि नंतर क्षमता नसतानाही त्याला मोठी कामे दिली. तसेच नीतेश राणे आणि ‘सार्वजनिक बांधकाम’च्या अधिकाऱ्यांचे ठेकेदार क्षेत्रातील किती चांगले घनिष्ठ संबंध हे जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांना माहिती आहेत. राजकोट येथील पुतळा उभारणीमागे नीतेश राणे आणि जयदीप आपटे यांचे हितसंबंध गुंतले आहेत. शिवपुतळा कोसळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. राज्यभरातील नेते राजकोट येथे येत आहेत. आमदार राणे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात. पक्ष बदलेल तशी त्यांची विचारधारा बदलत असते. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा नीतेश राणे अलीकडे कडवट हिंदुत्ववादी झाले आहेत. बांगलादेश, पश्चिम बंगाल, हैदराबाद, पाकिस्तान येथे घडलेल्या हिंदूंवरील अत्याचारांबाबत ते फार आक्रमक असतात. पण, त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात मालवण येथे तेवढी मोठी घटना घडली तरी त्यांनी या संदर्भात ब्रदेखील काढला नाही. त्यांचे हे मौन संशयाला जागा निर्माण करून देणारे आहे. जयदीप आपटे आणि आपल्या हितसंबंधांच्या संदर्भात नीतेश राणे यांनी जाहीर खुलासा करावा. तसेच आपटे याला राजकोटच्या शिव पुतळ्याचे काम देण्यामागे राणे - आपटे हितसंबंध कारणीभूत आहेत का? याची सखोल चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी करावी, अशी मागणीही पारकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT