कोकण

सिंधुदुर्गात मतदारांच्या संख्येत वाढ

CD

08206

सिंधुदुर्गात मतदारांच्या संख्येत वाढ

‘लोकसभे’नंतरची यादी ः महिला मतदार तुलनेत जास्त

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३० ः जिल्हा निवडणूक विभागाने १ जुलै २०२४ या अहर्ता तारखेवर आधारित अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध केली आहे. यात लोकसभेपेक्षा सात हजार ४८७ मतदारांची वाढ होवून एकूण मतदारसंख्या ६ लाख ७२ हजार ५३ एवढे मतदार झाले आहेत. पुरुषांपेक्षा ३ हजार ६७२ महिला मतदार जास्त आहेत. तृतीयपंथी एकच मतदाराची कणकवली विधानसभा क्षेत्रात नोंद झाली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली.
याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी दालन शेजारील बैठक सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी श्री. शेवाळे म्हणाले, ‘‘निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम राबविला होता. यात नवीन मतदार नोंदणी करणे, दुबार आणि मृत मतदार वगळणे, मतदारसंघ बदल करणे, फोटो बदल, नावात बदल तसेच पत्ता बदल अशी कार्यवाही या कार्यक्रम अंतर्गत केली आहे. त्यानुसार ही संख्या निश्चित करून अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध केली आहे. लोकसभेला असलेल्या मतदारांतील ६ हजार ९७२ मतदार वगळले आहेत. नव्याने ११ हजार ९७२ मतदार नोंदीत झाले आहेत.’’ निश्चित झालेली मतदारसंख्या तसेच होवू घातलेली विधानसभा निवडणूक या पाश्र्वभूमीवर आज जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बूथनिहाय एजेंट नियुक्त करण्याचा सूचना निवडणूक विभागाकडून करण्यात आल्या.
--------------------
तीन हजार ६७२ महिला मतदार जास्त
लोकसभेला ६ लाख ६४ हजार ५६६ मतदार होते. आता ती संख्या ६ लाख ७२ हजार ५३ झाली आहे. यात महिला ३ लाख ३७ हजार ८६२ असून पुरुष ३ लाख ३४ हजार १९० आहेत. तसेच एक तृतीय पंथी मतदार आहे. यातील कणकवली मतदार संघात दोन लाख २९ हजार ४४४ मतदार झाले आहेत. पुरुष एक लाख १३ हजार ४८२ महिला एक लाख १६ हजार ६१ मतदार आहेत. तसेच एक तृतीय पंथी मतदार आहे. कुडाळ विधानसभा क्षेत्रात पुरुष एक लाख ७ हजार २०१ आणि महिला एक लाख ८ हजार २८२ मिळून एकूण दोन लाख १५ हजार ५८३ मतदार आहेत. सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात पुरुष एक लाख १३ हजार ५०७ तर महिला एक लाख १३ हजार ५१९ असे एकूण दोन लाख २७ हजार २६ मतदारांची निश्चिती झाली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
-----------------
लोकसंख्येच्या तुलनेत नवमतदार नोंदणी कमी
जिल्ह्यात १८ ते २० वयोगटाची लोकसंख्या पाहता जिल्ह्यात ३१ हजार नवमतदार असणे गरजेचे होते. परंतु, या गटात केवळ १० हजार ४७१ एवढी नोंदणी झाली आहे. मात्र, या तुलनेत ५० ते ६० गटात लोकसंख्येच्या प्रमाणात ९३ हजार एवढी मतदार नोंदणी अपेक्षित होती. परंतु, या गटात एक लाख २७ हजार ३८६ एवढी नोंदणी झाली आहे, असे सांगण्यात आले. १८ वर्ष पूर्ण झालेले उमेदवार शिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जातात. ते तेथेच मतदार नोंदणी करतात. त्यामुळे या गटातील जिल्ह्यातील नोंदणीचे प्रमाण कमी असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ५० ते ६० गटातील नागरिक या वयात आपल्या गावी येतात. त्यामुळे या गटातील नोंदणी वाढली, असेही यावेळी सांगण्यात आले.
-----------------------
अशी आहे मतदार संख्या
वय*मतदार
१८-१९*१०४७१
२०-२९*११११५६
३०-३९*१२०३११
४०-४९*१४१०६९
५०-५९*१२७३८६
६०-६९*८४७०२
७०-७९*५२०७८
८० प्लस*२४८८० (यात १०० प्लस ५०४ मतदारांचा समावेश आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

Rahul Bondre BJP Entry Cancelled : राहुल गांधींचा एक कॉल प्रोब्लेम सॉल्व! राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; गांधींनी कॉलवर काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT