कोकण

स्टॉल हटविण्यासाठी अडविला रस्ता

CD

08218

स्टॉल हटविण्यासाठी अडविला रस्ता

सांगुळवाडीतील प्रकार ः वाहतूक ठप्प, पोलिसांकडून समज

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३० ः रस्त्यालगत असलेला स्टॉल हटवावा, यासाठी सांगुळवाडी येथील एकाने नावळे सांगुळवाडी मुख्य रस्ता चिरे टाकून अडविला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. या प्रकारामुळे तीन एसटीतील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, पोलिसांनी त्या ग्रामस्थास समज देत रस्ता खुला केला. हा प्रकार आज सकाळी आठच्या सुमारास घडला.
वैभववाडी-सांगुळवाडी नावळे मार्गावर खालच्या राववाडीजवळ कित्येक वर्षांपासून एक स्टॉल आहे. हा स्टॉल हटवावा, यासाठी काही वर्षांपासून त्याच गावातील एक ग्रामस्थ जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे मागणी करीत आहेत. यासंदर्भात त्यांनी सर्व विभागांशी पत्रव्यवहार केला. परंतु, तरीही त्यांच्या मागणीनुसार कार्यवाहीस बांधकाम विभागाने असमर्थता दर्शविली. पंचायत समितीकडून या तक्रारीची कार्यवाही ग्रामपंचायत कार्यालय सांगुळवाडीकडे दिली होती. ग्रामपंचायत सांगुळवाडी यांनी या तक्रारीची दखल घेत कार्यवाही करू, असे तक्रारदार ग्रामस्थाला सांगितले. परंतु, प्रत्यक्षात कार्यवाही न केल्याने तक्रारदार ग्रामस्थाने आज टोकाचे पाऊल उचलले. स्टॉलच्या समोरच रस्त्यावर चिरे टाकून वैभववाडी-सांगुळवाडी, नावळे मार्गावरील सर्व वाहतूक रोखून धरली. सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार केल्याने तीन एसटी बस तेथे थांबल्या होत्या. त्यामुळे गाडीतील प्रवाशी आणि विद्यार्थ्याची मोठी गैरसोय झाली. हा प्रकार पोलीसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन बेकायदेशीरपणे रस्ता अडविल्यास आपल्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी तक्रारदारास समज दिली. त्यानंतर रस्ता खुला करण्यात आला व वाहतूक सुरळीत सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT