कोकण

वैभव नाईकांमुळेच ‘राजकोट’मध्ये राडा

CD

08226

वैभव नाईकांमुळेच ‘राजकोट’मध्ये राडा

धोंडी चिंदरकर ः मताधिक्य कमी मिळाल्याने सैरभैर

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : राजकोट येथील राड्याला आमदार वैभव नाईक हेच जबाबदार आहेत. त्यांनी ॲक्शन दिल्याने आम्ही रिॲक्शन दिली. राडा संस्कृती वैभव नाईक यांचीच असून राडा करतात नंतर पळून जातात. लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघात मताधिक्य कमी मिळाल्याने वैभव नाईक सैरभैर झाले आहेत. त्यामुळे भविष्यात सुद्धा ते काहीतरी घडवतील, असा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. शिवाय राजकोट किल्ल्यातील कामे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचेही चिंदरकर यांनी सांगितले.
येथील भाजप कार्यालय येथे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, दीपक पाटकर, जगदीश गावकर, उत्तम पेडणेकर, आबा आडकर, नितेश पेडणेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. श्री. चिंदरकर म्हणाले, ‘‘राजकोट येथील घटना समर्थन करणारी नक्कीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. यात जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच. मात्र, यात राजकारण होता नये. हा पुतळा पुन्हा उभा करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. परंतु, या पुतळ्याचा विषय घेऊन ठाकरे गट राजकारण करत आहे. किल्ल्यावरील दगड पाडण्याचे काम ठाकरे गटाचे कार्यकर्ते करत होते. कालच्या राड्याला पूर्णतः आमदार नाईक जबाबदार आहेत. खासदार नारायण राणे यांनी बारा वाजताची वेळ आधीच जाहीर केली होती. सर्व अधिकाऱ्यांशीही तशी चर्चा केली होती. असे असताना ठाकरे गट जाणूनबुजुन वेळेच्या आधी राजकोट किल्ल्यामध्ये पोहोचला. समोरून ॲक्शन आल्याने आम्ही रिॲक्शन दिली. या घटनेत पोलिसांची चुक आहे. खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे हे राजकोट किल्ल्यामध्ये असताना आदित्य ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांना किल्ल्यामध्ये सोडणे योग्य नव्हते. तरीही गेटवरील पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना न जुमानता राजकोट किल्ल्यात त्यांनी प्रवेश केला. राजकोट किल्ल्यात येऊन केलं काय? शेवटी अडीच तास किल्ल्यात कोंडून ठेवले. हीच का तुमची ताकद? आमच्या नेत्यांवर बोलण्याची तुमची कुवत आहे का? वैभव नाईक कधीचे निष्ठावान, ते ते तर काँग्रेसमधून आले आहेत. कार्यालय फोडणे ही राडा संस्कृती नव्हे का? राजकोट किल्ल्यातील सुशोभीकरणाची कामे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे या निकृष्ट कामाची चौकशी नक्कीच व्हायला हवी. राडा संस्कृती ही वैभव नाईक यांचीच आहे. ते सुरुवात करतात आणि नंतर पळून जातात. मात्र, नारायण राणे, निलेश राणे असतील हे त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात ४० हजार मताधिक्य कमी मिळाल्याने नाईक यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. त्यामुळे भविष्यात ते अजूनही काहीतरी घडवण्याची शक्यता आहे. भाजप कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली कोण राजकारण करत असतील तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT