11815
11816
सावंतवाडीत गणेश देखावे लक्षवेधी
सार्वजनिक गणेशोत्सव; विविध कार्यक्रम, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून अकरा, सतरा, एकोणीस व एकवीस दिवस गणरायांची प्रतिष्ठापना केली जाते. या मंडळातर्फे धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. मंडळांनी तयार केलेले आकर्षक देखावे भाविकांसाठी आकर्षण ठरत असून, ते पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
शहरातील सालईवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडाचा गणपती हा कोकणातील पहिला सार्वजनिक गणपती आहे. गेली दोन वर्षे हे मंडळ राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. या ठिकाणी २१ दिवस उत्साहाचे वातावरण असते. यंदा भक्त पुंडलिकाचा देखावा गणरायाच्या चरणी साकारण्यात आला आहे. सालईवाडा येथे भट्टीवाडा गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा विराजमान झाला आहे. या मंडळाचा गणेशोत्सव १७ दिवसांचा असतो. यंदा मंडळाची दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती खास आकर्षण ठरत आहे. सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून इंदिरा गांधी व्यापारी संकुलात ११ दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. नगरपालिका व व्यापारी वर्ग हा उत्सव साजरा करतात. यंदा मंडळाने श्री महालक्ष्मीचा देखावा सादर केला आहे.
जुना बाजार येथील देव नरसोबा मंदिर येथे १७ दिवसांच्या गणरायाची स्थापना केली आहे. पालखीतून निघणारी विसर्जन मिरवणूक या मंडळाचे आकर्षण असते. उभाबाजार मारुती मंदिर येथे २१ दिवसांच्या गणरायांची भक्तिभावाने सेवा केली जाते. विविध कार्यक्रमांची रेलचेल, धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात. वैश्यवाडा येथील हनुमान मंदिरात २१ दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. येथे संकष्टीला सहस्र मोदकांचा नैवेद्य गणरायाला दाखविला जातो.
---
चितारआळीत ‘मार्कंडेय जन्म’
चितारआळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून ११ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विविध सामाजिक उपक्रम हे मंडळ राबविते. चलचित्र देखावा या मंडळाचे खास आकर्षण ठरते. यंदा या गणरायासमोर ‘मार्कंडेय जन्म’ हा देखावा सादर केला आहे. पोलिस ठाणे येथे देखील १९ दिवसांच्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. पोलिस ठाण्यातील नेमणूक अधिकारी, अंमलदार यांच्याद्वारे हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.