11837
राजंगातर्फे फार्मर प्रोड्युसरतर्फे
कृषी अवजारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ः राजापुरातील राजंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीने किफायतशिर दरामध्ये कृषी अवजारांचे वितरण केले. या कंपनीद्वारे गोविंदराव निकम कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, मांडकी पालवण येथे झुडपांसहीत वनस्पती खोड नाश करणारी किसान क्राफ्ट कंपनीची स्टबल मूव्हर मशीन देण्यात आली. त्याचे प्रात्यक्षिकही करुन दाखवण्यात आले.
राजंगा कंपनीचे शेअर डॉ. निखिल चोरगे यांनी खरेदी करुन शेतकर्यांच्यादृष्टीने सदैव कर्तव्यतत्पर असणार्या या शेतकरी कंपनीसाठी वेळोवेळी गरजेनुरूप सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी मांडकी पालवणचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, संस्थेचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, राजंगा कंपनीचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ, उपाध्यक्ष हरेंद्र बाणे तसेच कॉलेज पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत अॅग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेली राजापूर येथील राजंगा फार्मर प्रोड्यूसर या शेतकरी उत्पादक कंपनीतून वेळोवेळी सभासद शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. कंपनीमार्फत शेतकऱ्यांना विविध शेतीविषयक अवजारे, औषधे, बी बियाणे, खते, कृषी प्रक्रिया उपयुक्त विविध साधन सामुग्री व प्रक्रिया अवजारे तसेच शेती विषयक सल्ला व मदत वेळोवेळी केली जाते. डॉ. चोरगे हे कंपनीचे सभासद झाले आहेत. त्यांनी कंपनीवर दाखविलेला विश्वास भविष्यात सार्थ ठरवू असे राजंगाचे अध्यक्ष गोंडाळ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.