कोकण

कोकणच्या समस्यांबाबत राज्यपालांचा सकारात्मक प्रतिसाद

CD

11940

कोकणात हवे जागतिक पातळीवरचे बंदर
बाळ माने ; राज्यपाल राधाकृष्णन् यांची घेतली भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : विकासाच्या दृष्टीने कोकणात असमतोल पाहायला मिळतो. आंबा, काजू बागायतदार आणि मच्छीमारांच्या समस्या आहेत. तसेच कोकण रेल्वेतर्फे अन्य मार्ग बांधण्याची गरज आहे. शिवाय जागतिक पातळीवरचे बंदर व्हायला हवे. या दृष्टीने रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. विविध विकासात्मक मुद्द्यांवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती बाळ माने यांनी दिली.
ते म्हणाले, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, चिपळूण- कराड मार्ग, वैभववाडी-कोल्हापूर मार्ग आणि जयगड- डिंगणी मालवाहतूक रेल्वे होण्याकरिता राज्यपालांसोबत सकारात्मक चर्चा झाली. राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे चार दशकांहून अधिक राजकीय, प्रशासकीय अनुभव आहे. याचा उपयोग कोकण विकासासाठी होईल. कोकणातील प्रलंबित प्रकल्पांविषयी राज्य शासनासह केंद्र सरकार, केंद्रीय गृह मंत्रालय, आणि प्रधानमंत्री कार्यालयाकडे राज्यपाल पाठपुरावा करू शकतील. रेल्वेमार्गाबाबत राज्यपालांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली आहे.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील काही तांत्रिक त्रुटी दूर झाल्या पाहिजेत. मच्छीमारांना रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जागतिक दर्जाचे बंदर हवे आहे. त्याचबरोबर मत्स्य प्रक्रिया उद्योगांना प्राधान्याने निर्यातीसाठी अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी केल्याचे बाळ माने यांनी नमूद केले. श्री. माने यांनी माजी आमदार राजन तेली, माधवी माने, मिहिर माने, विराज माने यांच्यासमवेत राज्यपाल राधाकृष्णन् यांची राज्यपाल भवनात भेट घेतली.

चौकट
कमी पैशांत औषधे हवीत
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू शेतकरी अडचणीत आहेत. बॅंकांची थकित कर्जे आहेत. त्यांना नव्याने कर्ज मिळत नाही. त्यांचे कर्ज माफ व्हावे आणि सवलतीच्या दरात व सीबिल स्कोअर न पाहता विशेष बाब म्हणून आंबा, काजू बागायतदारांना उभे राहण्यासाठी प्रयत्न करावा. हवामानातील बदलामुळे आंबा, काजू पिकाचे रक्षण होत नाहीये. त्याकरिता फवारणीसाठी महागडी औषधे घ्यावी आहेत. त्यामुळे पर्यायी औषधांचे संशोधन व्हावे, ही औषधे कमी किंमतीत मिळावीत, यासाठी आयसीआर यांना राज्यपालांनी सांगावे, असे सुचवले. काजूला हमीभाव मिळावा. तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्याला वाहतूक व पॅकेजिंगसाठी सबसिडी द्यावी, अशी मागणी श्री. माने म्हणाले यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT