भरणेजवळ मोटारीच्या
धडकेत वृद्धाचा मृत्यू
खेड : भरणेनजीक रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला अज्ञात मोटारीने धडक दिली. या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. मात्र अपघातानंतर घटनास्थळावरुन मोटारचालकाने पलायन केले. तानाजी दाजी शिंदे (वय ६५, रा. धोगरे-जाखणवाडी, ता. खेड) असे त्या जागीच मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १५) दुपारी दीडच्या सुमारास घडली. तानाजी शिंदे हे भरणे येथील आपल्या नातलगाकडे वाढदिवसासाठी आले होते. भरणे येथील इतर नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना रस्ता ओलांडताना मोटारीने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटारचालकाने लागलीच घटनास्थळावरुन पलायन केले. मात्र त्यास खेड रेल्वे स्थानकानजीक पकडण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
---------
दुचाकीच्या धडकेत
पादचारी महिला गंभीर
खेड : मुंबई- गोवा महामार्गावरील वेरळ-रेमजेवाडी एसटी बस थांब्याजवळ दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी झाली आहे. वासंती भोसले (६५, रा. शिरगाव खोपी, ता. खेड) असे या गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १५) दुपारी पावणेएकच्या सुमारास घडली. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, राकेश जनार्दन पोफळकर (१८, ऐनवरे, खेड) हा खोपीच्या दिशेने जात होता. वेरळ-रेमजेवाडी येथील बस स्टॉपजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व पादचारी महिलेला धडक बसली. या अपघाताची माहिती श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज धाम यांच्या रुग्णवाहिकेचे चालक सूरज हंबीर यांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमीना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात स्वारही किरकोळ जखमी झाला असून पादचारी महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.