कोकण

डेरवणमध्ये मोफत शस्त्रक्रीया

CD

डेरवणमध्ये मोफत शस्त्रक्रिया
खेड ः वालावलकर रुग्णालयाच्या कान- नाक- घसा विभागातर्फे सायनसवरील आजारासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर झाले. शिबिरात २० रुग्णांवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शिबिरासाठी मुंबई तसेच सांगली- मिरज वरून कान- नाक- घसा तज्ज्ञ आले होते. यामध्ये केइएम मुंबईचे डॉ. मिलिंद नवलाखे, सांगलीचे डॉ. सचिन निलाखे व मिरजचे डॉ. राहुल गोसावी या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता. या शिबिरामध्ये सायनसवरील आजारासाठीचे अतिशय कठीण अशा २० शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात आल्या.
----
डेरवणच्या तिघांचे
नेमबाजीत यश
खेड ः केंद्रीय माध्यमिक शिक्षण परिषद (सीबीएससी) अंतर्गत शाळांच्या नेमबाजी (शुटिंग) स्पर्धा केरळ येथील साई कृष्णा पब्लिक स्कूल येथे झाल्या. या स्पर्धेत ८१९ खेळाडूंचा सहभाग होता. डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चारिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात असणाऱ्या अद्यावत शुटिंग रेंजमध्ये सराव करणाऱ्या तीन खेळाडूंनी या स्पर्धेत उत्तुंग यश मिळवले. रायफल शुटिंग या क्रीडा प्रकारात संस्कार शेडगे याने सातवा क्रमांक, प्रथमेश कदम याने पाचवा क्रमांक आणि हर्ष बागवे याने कास्यपदक जिंकले. हे तिन्ही विद्यार्थी डेरवण येथील एसव्हीजेसीटी ट्रस्टच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. शाळेच्या संचालिका शरयू यशवंतराव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, क्रीडा संयोजन समितीचे प्रशांत सावंत, अजित गालवणकर, योगेश विचारे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT