वागदेतील आर्यादुर्गा मंदिरात
नवत्रोत्सवानिमित्त कार्यक्रम
कणकवली,ता. ३० ः दुर्गापासक ऐक्यवर्धक संघ आर्यादुर्गा मंदिर, वागदे यांच्यावतीने आर्यादुर्गा देवीचा नवरात्रोत्सव गुरुवारी (ता.३) ते शनिवारी (ता.१२) या दरम्यान आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
गुरुवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता घटस्थापना, देवीची महापूजा, चंडीपाठ, कुमारीपुजन, दररोज दुपारी १२ वाजता आरती, दुपारी ३ ते ३.३० वाजता पुराण वाचन, पु.वि. काजरेकर, जांभवडे यांचे तर सायंकाळी ३.४५ ते ५.१५ वाजता सुश्राव्य कीर्तन पुरुषोत्तमबुवा पोखरणकर, पोखरण हे सादर करतील. सायंकाळी ७.३० ते ८.३० वाजता दररोज पालखी प्रदक्षिणा, आरती, सायंकाळी ५.३० ते ७.३० वाजता होणारे सांस्कृतिक कार्यक्रम असे ः ३ ऑक्टोबर रोजी महापुरुष भजन मंडळ, नागवे (भटवाडी) यांचे भजन, ५ ऑक्टोबर रोजी मुकुंदराव क्षीरसागर जोधपुर यांचे गायन, ६ रोजी आदर्श संगीत विद्यालय कणकवली प्रस्तुत शास्त्रीय व सुगम संगीत गायन मैफल ‘तेजोमय नादब्रह्म’. ७ रोजी भावगंध रत्नागिरी प्रस्तुत ‘भावभक्ती’ नाट्यगीत मैफल, १० ऑक्टोबर रोजी अष्टधान सेवा तसेच १२ रोजी सकाळी नवरात्रोत्थापणा आणि दसरा, सायंकाळी ४ ते ५ वाजता लळीताचे कीर्तन, सायंकाळी ५.३० वाजता सोने लुटणे, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद वाटप होईल. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.