कोकण

विभागीय फुटबॉल स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे यश

CD

15064

विभागीय फुटबॉल स्पर्धेमध्ये
सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे यश

आंबोली, ता. ३० ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि क्रीडा उपसंचलनालय, कोल्हापूर विभागातर्फे आयोजित विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत विभागस्तरावर सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲड. ज्युनियर कॉलेज संघाने तृतीय क्रमांक पटकवत देदीप्यमान यश प्राप्त केले.
डेरवण क्रीडा संकुल, चिपळूण येथे २७ सप्टेंबरला आयोजित विभागस्तरावरील शालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात सातारा जिल्ह्यातील सैनिक स्कूल सातारा विरुद्ध १-० गोल नोंदवत प्रथम सामना जिंकला. सेमी फायनल फेरीत सैनिक स्कूल संघाचा सामना कोल्हापूर संघाविरुद्ध झाला. तृतीय क्रमांकासाठी सांगली संघाविरुद्ध ३-० गोल नोंदवत विजय मिळविला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना सिंधुदुर्ग सैनिक स्कूल संघाने विभागस्तरावरील बलाढ्य संघांविरुद्ध चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट खेळ करणाऱ्या दोन खेळाडूंची निवड राज्यस्तरीय संघात होणार आहे. विजेता संघ व क्रीडाशिक्षक मनोज देसाई, सतीश आईर यांचे संस्थाध्यक्ष सुनील राऊळ. संचालक जॉय डान्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य एन. डी. गावडे, सर्व संचालकांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

Marathi News Live Updates : बहुचर्चित सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा अखेर बिगुल; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी

Kolhapur Land Fraud : मळवीवाडी जमीनप्रकरणी आरोपीची जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी;शिक्का ताब्यात, वरिष्ठांनी घेतली माहिती

SCROLL FOR NEXT