कोकण

आरोग्य शिबिरात ७३ ग्रामस्थांची तपासणी

CD

आरोग्य शिबिरात ७३ ग्रामस्थांची तपासणी

चिखलीत आयोजन; श्री गणेश मंदिर मंडळाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ३० ः संगमेश्वर तालुक्यातील श्री गणेश मंदिर चिखली कानालवाडी येथे गोळवलकर गुरूजी स्मृती ग्रामविकास प्रकल्प आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान यांच्यातर्फे सेवांकुर भारत कोकण प्रांत यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. शिबिराचा लाभ ७३ ग्रामस्थांनी घेतला.
या शिबिराचे उद्‍घाटन माजी पंचायत समिती सभापती प्रेरणा कानाल यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरात ३२ जणांची रक्तगट तपासणी करण्यात आली. या सर्वांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. आरोग्य शिबिरासाठी डॉ. मंगेश सातभाई यांच्या मार्गदर्शनाखाली सेवांकुरचे डॉ. हृषिकेश गोरे, डॉ. अथर्व शिरोडकर व इतर १६ प्रशिक्षित डॉक्टरांचे पथक उपस्थित होते. डॉ. सन्मान बेलवलकर व डॉ. नितीन गाडेकर या तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिराला भेट घेऊन सहकार्य केले. त्यांच्या मदतीसाठी वालावलकर रुग्णालयाचे डॉ. आर्या कोराणे व डॉ. अनिकेत गायकवाड पथकासह उपस्थित होते. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र कडवईचे सुपरवायझर हेमंत रेवाळे, समुदाय आरोग्य अधिकारी अमोल म्हस्के, बालाजी गुट्टे व महालॅबच्या वैशाली पुरोहित यांचे सहकार्य लाभले. श्री गणेश मंदिर कानालवाडी या मंडळाकडून नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वेळी त्यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबई महापालिकेतील ८०० अभियंत्यांच्या बदल्या, नवे आदेश जारी होणार; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांची उचलबांगडी

Solapur News: पगारात ६०० रुपये जास्त गेल्याने मारहाण अन् अपमान; कामगार तरुणाने जीवन संपवले, दोन वर्षांपूर्वी विवाह, महिन्याभराचा मुलगा

Cracks Appear Before Road Completion: पूर्ण होण्याआधीच महामार्गाला भेगा; गुणवत्तेची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

Kolhapur Ganeshotsav : देखाव्यांचा थाट, रस्त्यांवर गर्दीची लाट शहरात बहुतांश देखावे सुरू; राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पेठेत गर्दी उसळली

Ajit Agarkar याला भारताच्या T20I कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडला बसवायचे होते, पण...! इथूनच सुरू झाला BCCI सोबत राडा?

SCROLL FOR NEXT