कोकण

-चिखलीत गंजलेला विद्युतखांब कोसळला

CD

- rat३०p१२.jpg-
P२४N१५०६६
संगमेश्वर ः चिखली येथे गंजलेला विजेचा खांब कोसळून घराचे नुकसान झाले.
----------

चिखलीत गंजलेला विद्युतखांब कोसळला

वीजप्रवाह बंद असल्याने मोठा अनर्थ टळला
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३०ः संगमेश्वर तालुक्यातील चिखली-बौद्धवाडी येथे गंजलेला विद्युतखांब कोसळला. याबाबत गेली दोन वर्षे महावितरण कंपनीला वारंवार कल्पना देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम यांनी सांगितले. वीजप्रवाह बंद असताना हा खांब कोसळला अन्यथा जीवितहानी झाली असती, असेही कदम यांनी सांगितले.
चिखली बौद्धवाडी येथे अनेक विद्युतखांब हे पूर्णतः गंजलेले असून, याबाबत गेली दोन वर्षे ग्रामस्थ हे वारंवार महावितरण कंपनीकडे तक्रार करत आहेत; मात्र महावितरणकडून दुर्लक्ष झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शुक्रवारी सकाळी सुशील जाधव यांच्या घराजवळचा गंजलेला विद्युतखांब अचानक कोसळला. त्यामुळे जाधव यांच्या घराचे पत्रे तुटले. तिथूनच काही अंतरावर असणाऱ्या बौद्धविहाराजवळून काही मुले जात होती. त्यांच्या अंगावर तुटलेली वीजवाहिनी पडली; मात्र त्या वेळी रांगव येथे वीजवाहिनी तुटून बैल दगावला असल्याने वीजप्रवाह बंद करण्यात आलेला असल्याने जीवितहानी टळली. तुरळ महावितरण कार्यालयाच्या हद्दीत असे खांब गंजून कमकुवत झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत; मात्र महावितरण दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT