- rat३०p१६.jpg-
P२४N१५०७२
जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेतील विजेते खेळाडू.
ज्ञानदीपच्या २० खेळाडूंना सुवर्णपदक
जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा ; विभागीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३० : क्रीडा व युवक सेवासंचलनालय व क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा २०२४-२५ स्पर्धेत ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल (सीबीएसई) मोरवंडे-बोरज या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी २० सुवर्णपदकांसह एकूण २९ पदकांची कमाई केली आहे.
यशस्वी झालेल्या खेळाडूंमध्ये अर्चित पाटील, रिषभ मोरे, अक्षरा मोरे, स्वरा तेटांबे, गायत्री मिश्रा, भक्ती वायकर, तृणा कदम, जानकी पटेल, पायल जाधव, निशांत कदम, राज खाके, अभिमन्यू जाधव, हर्ष उंड्रे, अथर्व पालांडे, वेदिका सकपाळ, समृद्धी भोसले, श्रुतिका लिंगायत, श्रावणी हेंद्रे, मैथिली मोहिरे, पियुष साळुंके (सर्व सुवर्णपदक); श्रवण आंब्रे, हर्ष पालांडे, ओम जाधव, मैत्रेय घोसाळकर, श्रीकांत सावर्डेकर (सिल्वर मेडल); वेदांत मोरे, श्लोक गोपाल, हर्षित कुमार, नील क्षीरसागर (सर्वाना ब्राँझ मेडल), असे एकूण २९ पदकांची कमाई केली. सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंची कोल्हापूर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक आशिष देशमाने यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, सरचिटणीस प्रकाश गुजराथी यांच्यासह संस्थापक सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.