15093
सिंधुदुर्गचा दंतचिकित्सा विभाग सक्षम
यंत्रसामग्रीचे लोकार्पण; दातांच्या आजारांवर होणार मोफत उपचार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या दंत चिकित्सालयासाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्री काँग्रेसचे राज्यसभा सदस्य डॉ. कुमार केतकर यांच्या खासदार निधीतून उपलब्ध झाली आहे. याचा लोकार्पण कार्यक्रम आज येथे झाला. त्यामुळे हा विभाग आता सक्षम झाला असून, याचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दंतचिकित्सा विभाग कार्यरत आहे; मात्र येथे आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने केवळ दात काढणे व दुखणाऱ्या दातांवर औषधोपचार करणे, एवढीच आरोग्य सेवा दिली जात होती. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य डॉ. कुमार केतकर यांच्या खासदार निधीतून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील दंतविभागाला दिलेल्या २२ लाख रुपये निधीतून आवश्यक सर्व यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता दातांच्या सर्व आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहे. रुग्णाच्या दाताची कवळी, तसेच विविध आकारांचे दात बनविणे आता येथे शक्य होणार आहे. त्यासाठी येथे तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त केले आहेत. दाताच्या कोणत्याही आजाराच्या रुग्णाला अन्यत्र उपचार घेण्याची आवश्यकता नाही. येथे सर्व उपचार मोफत दिले जाणार आहेत. सर्व सुविधांयुक्त अशी दंत चिकित्सा लॅबमध्ये निर्माण झाली आहे, अशी माहिती डॉ. विनय सूर्यवंशी यांनी दिली.
---
डॉ. केतकरांच्या निधीतून यंत्रसामग्री
डॉ. केतकर यांच्या खासदार निधीतून उपलब्ध झालेल्या यंत्रसामग्रीचा आज लोकार्पण सोहळा झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, साईनाथ चव्हाण, नागेश मोरये, अभय शिरसाट, प्रकाश जैतापकर, एकनाथ धुरी, प्रकाश डिचोलकर यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय, तसेच जिल्हा रुग्णालयाचे विविध डॉक्टर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.