कोकण

कबड्डी स्पर्धेत कोळथरेचा संघ विजयी

CD

कबड्डी स्पर्धेत
कोळथरेचा संघ विजयी

दापोली ः तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कोळथरे येथील आई आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिरच्या मुलींच्या कबड्डी संघाने सर्वोत्तम खेळ करत विजेतेपद पटकावले. मुरूड येथे झालेल्या स्पर्धेत आपल्या लौकिकाला साजेसा चतुरस्त्र खेळ करत कोळथरे शाळेच्या मुलींनी तालुक्याचे विजेतेपद पटकावले. तालुक्यातील विविध नामांकित शाळांच्या संघांना धूळ चारत या स्पर्धेतील विजेतेपदाला गवसणी घातल्यामुळे संघाचे विशेष कौतुक होत आहे. संघाला कबड्डी प्रशिक्षक सचिन चव्हाण, मुख्याध्यापक नरवणकर, प्रशांत जाधव, सुरेश सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. कोळथरे पंचक्रोशी विकास मंडळाचे अध्यक्ष दीपक महाजन यांनी संघासह सहकाऱ्यांचे कौतुक केले.
-------
दहा शेतकऱ्यांचा
पाटपन्हाळेत सत्कार

गुहागर ः पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या सभेत गावातील दहा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या शेतकऱ्यांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली आहे तसेच भाजीपाल्याच्या उत्पादनातून अर्थार्जनाचा पर्याय निर्माण केला आहे. या सभेला सुमारे १११ सभासद उपस्थित होते. तालुक्यामध्ये एक मोठी सोसायटी असून या ठिकाणी शेतकऱ्यांना अल्पमुदत व मध्यम मुदत कर्ज दिले जाते. शेतीसाठी लागणाऱ्या खतांची मागणी करून वाटप केले जाते. इतर बँकांप्रमाणेच या ठिकाणी ठेवीही ठेवल्या जातात. या सभेमध्ये अनंत गावडे, संकेत रावणंग, महेंद्र गावडे, सुनील गावडे, प्रवीण गावडे, विलास पागडे, नितेश पागडे, विजय पागडे, संजय भेकरे यांचा सोसायटीतर्फे सन्मान करण्यात आला. या शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी शेतीकडे वळावे व जास्तीत जास्त शेती करावी. आपल्या सोसायटीकडून आपल्याला शक्य तेवढे सहकार्य असेल असे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मयू कोळवणकर यांनी सांगितले. या वेळी उपस्थित असलेले या सोसायटीचे सभासद व पाटपन्हाळे गावाचे नवनिर्वाचित महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश चव्हाण यांचाही संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
-----------
अण्णासाहेब बळवंतरावांचा सन्मान

गावतळे ः दापोली तालुका शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये निपूण भारतसह मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या व्हिजन दापोली या उपक्रमाद्वारे तालुक्यात शाळांमधून होत असलेला सकारात्मक बदल, गुणवत्ता वाढ, नासा-इस्रो अभ्यासदौरा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी नियोजन व कार्यवाही यामुळे ग्रामीण भागातून तळागाळातील सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण यशस्वी कामगिरी आदींची दखल घेत महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त जनकल्याण संस्थेतर्फे दापोलीचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट गटशिक्षणाधिकारी पुरस्कार `देऊन गौरव करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, हभप भगवान कोकरे, अध्यक्ष उदयसिंह पाटील आदींच्या हस्ते कोल्हापूर येथे त्यांना गौरवण्यात आले.
-----
हिंदी शिक्षक पुरस्कार
मंजिरी शितूत यांना प्रदान

दापोली ः हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने २०२३-२४ या वर्षासाठी प्रदान करण्यात येणारा जिल्हा कृतिशील हिंदी शिक्षक पुरस्कार तालुक्यातील पालगड येथील सानेगुरूजी हायस्कूलच्या हिंदी विषय शिक्षिका मंजिरी शितूत यांना देण्यात आला. हा कार्यक्रम चिपळूण येथील माधव सभागृहात झाला. या वेळी राज्य हिंदी मंडळाचे अध्यक्ष आनलकुमार जोशी, जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद कडवईकर, उपाध्यक्ष सत्यवान दळवी, राजेश खांबे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT