कोकण

वेळीच उपचार घेतल्यास हृदयरोगाचा धोका टळतो

CD

15098

वेळीच उपचार घेतल्यास
हृदयरोगाचा धोका टळतो

डॉ. पाटील ः जिल्हा रुग्णालयात हृदय दिन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः ‘‘मानवी शरीरात हृदय फार महत्त्वाचे आहे. त्यामध्ये बिघाड झाल्यास मृत्यूही येऊ शकतो. त्यामुळे हृदयासंबंधी कोणतीही समस्या असल्यास तत्काळ उपचार घ्यावेत. नियमित तपासणी सुरू ठेवावी,’’ असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी जागतिक हृदय दिन कार्यक्रमात केले.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आज जागतिक हृदय दिन कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. शाम पाटील यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील विविध डॉक्टर, कर्मचारी, उपचारांसाठी आलेले रुग्ण उपस्थित होते. या कार्यक्रमात हृदयसंबंधित आजार व दिले जाणाऱ्या उपचारांसंबंधी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. मानवी शरीरात हृदयाला फार महत्त्व आहे. त्यातील बिघाडामुळे उच्च रक्तदाब, तसेच ‘हार्टअटॅक’सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. तेव्हा हृदयासंबंधी कोणत्याही समस्या असल्यास तत्काळ उपचार करून घ्यावेत. नियमित औषधोपचार व पोषक आहार घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या व वेळीच उपचार घ्यावेत. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळू शकतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

SCROLL FOR NEXT