जिल्ह्यात नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी
मुर्तीकाम अंतिम टप्यात ; ४२५ ठिकाणी दुर्गामातेच्या मुर्तीची प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची सार्वजनिक मंडळांकडून तयारी सुरू झाली असून या उत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. शहरी व ग्रामीण भागात देवींच्या सुबक मुर्तीची कामे अंतिम टप्यात आले आहे. गुरुवारी (ता. ३) जिल्ह्यात ४२५ ठिकाणी दुर्गामातेच्या मुर्तींची प्रतिष्ठापना होणार असून ९० ठिकाणी फोटो पूजन घरोघरी खासगी तर काही ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात येणार आहे. या उत्सवांतर्गत विविध सार्वजनिक मंडळातर्फे दांडिया नृत्य तसेच स्पर्धेचे आयोजन केल्याने तरुणाईला आतापासूनच या स्पर्धेचे वेध लागले आहेत.
कोकणात पूर्वी ग्रामदेवतांच्या मंदिरापुरताच घटस्थापना करण्यापर्यत उत्सव मर्यादित होता. नवरात्रौत्सवात ग्रामीण भागात मंदिरामध्ये देवीला रुपे लावली जातात. ग्रामदेवतांच्या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात येते. ३६ हजार ६२९ ठिकाणी खासगी तर १७४ ठिकाणी सार्वजनिक घटस्थापनेच्या ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सव मंडळांसह अनेक ठिकाणी दांडिया स्पर्धेत आयोजन करण्यात येत असल्याने या उत्सवाची रंगत आणखीन वाढत आहे. दोन दिवसांवर घटस्थापना आल्यामुळे मुर्तीकारांचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.