बालवाडीच्या ओसरीत भरते
मेर्वी गुरववाडीची शाळा
इमारतीसाठी निधीची मागणी; कार्यवाही मात्र शून्य
पावस, ता. ३० ः रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी (सेमी इंग्रजी) जिल्हा परिषद शाळेसाठी स्वतंत्र इमारत नसल्याने शाळा बालवाडीच्या ओसरीत भरत आहे. शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार व खासदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बालवाडीची इमारत सेस फंड व ग्रामपंचायतीच्या निधीतून बांधण्यात आली होती; परंतु ती मोडकळीस आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नव्या इमारतीचा प्रस्ताव पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे पाठवला आहे. सध्याची इमारत अत्यंत धोकादायक झाल्याने मेर्वी गुरववाडीतील शाळा बालवाडीच्या ओसरीत (पडवी) भरत आहे. ग्रामपंचायतीकडून इमारतीसाठी २८ ऑगस्टला शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच महिला बालकल्याण अधिकारी यांच्याकडेही २५ जुलैला इमारतीचा प्रस्ताव पाठवला आहे; परंतु त्यावर कार्यवाही झालेली नाही. पालकमंत्री यांच्याकडेही यापूर्वी १ डिसेंबर २०२२ आणि आत्ता २२ जुलै २०२४ ला मागणी अर्ज दिला होता; परंतु त्यावरही कार्यवाही झालेली नाही. शाळेला इमारत देण्याबाबत दुर्लक्ष का केले जात आहे, याबाबत ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.