कोकण

खुनाच्या मुळापर्यंत जाऊन न्याय दिला जाईल

CD

...तर मुळापर्यंत जाऊन न्याय देऊ

ग्रामस्थांना पोलिसांचे आश्वासन ; संदीप फटकारेचा मृत्यू प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३० : रत्नागिरी तालुक्यातील चांदोर तळीवाडी येथील वडापाव व्यावसायिक संदीप नारायण फटकारे यांच्या व्हिसेरा अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. ग्रामस्थांच्या संशयानुसार संशयित व्यक्तीचा तपास सुरू आहे. तपासामध्ये कोणताही खंड पडलेला नाही. खरोखरच खून झाला असेल तर त्या खुनाच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी करून त्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर यांनी ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये दिले.
पूर्णगड पोलिस ठाण्यावरील मोर्चा रद्द झाल्यानंतर चांदोर येथे आज आयोजित करण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत त्यांनी हे स्पष्ट केले. चांदोर तळीवाडी येथील संदीप नारायण फटकरे (वय ३३) यांचा सापुचेतळे येतील वडापावच्या गाडीजवळ मृत्यू झाला. हा मृत्यू ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला असल्याने ग्रामस्थांनी गावामध्ये एक बैठक घेतली. त्याच्या मृत्यूचे कारण समजावे आणि संशयितावर कारवाई करावी यासाठी आज पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यावर न्याय्य हक्कासाठी ग्रामस्थ धडकणार होते; परंतु जिल्ह्यामध्ये मनाई आदेश असल्याने ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यावरील मोर्चा स्थगित केला. पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल केदारी यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर आज उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे आणि पोलिस अंमलदार प्रशांत पाटील, संदेश चव्हाण, प्रकाश झोरे आदींनी चांदोर गावाला व घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर गावातील एका प्रांगणामध्ये ग्रामस्थ एकत्र जमले होते. सुमारे साडेतीनशे ते चारशे ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. या वेळी पोलिस अधिकारी माईणकर यांनी ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेतल्या. या संदर्भात मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी अहवाल लवकरात लवकर प्राप्त झाल्यानंतर मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल. फटकरे ज्या वडापावच्या गाडीजवळ पडले होते. त्या दरम्यान असलेल्या संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे. चौकशीचा फेरा थांबलेला नाही. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन त्याची चौकशी करू. फटकरे यांच्या मृत्यूला न्याय देऊ, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन झाल्याने तपासाला सहकार्य करण्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Dudhganga Canal Project Update : 1995 पासून रखडलेला दूधगंगा डाव्या कालव्याचा प्रकल्प; 31 वर्षे लोटली तरी काम अपूर्णच, शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT