सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण
तरुणीशी गैरवर्तनाचा आरोप; बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्याने एका तरुणीशी गैरवर्तन केल्याचा आक्षेप घेऊन त्या पदाधिकाऱ्याला तरुणीच्या नातेवाइकांनी बेदम चोप दिला. शहरातील काँग्रेसभुवन येथे आज दुपारी ही घटना घडली. त्यामुळे बेशुद्धावस्थेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात हलविले आहे.
घटनास्थळावरुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार, त्या पदाधिकाऱ्याने कामाला असलेल्या मुलीला दोन महिन्यांचा पगार दिला नव्हता. तसेच तिच्याशी गैरवर्तन केल्याचे बोलले जाते. याबाबत तरुणीने आपल्या घरी सांगितले. आज दुपारी नातेवाइकांनी येऊन त्या पदाधिकाऱ्याला चोप दिला. या मारहाणीत पदाधिकारी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र अधिक उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र अद्यापही तो पदाधिकारी बेशुद्ध आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.