कोकण

मुणगे ग्रामपंचायतीमधून माहिती न मिळाल्याने अपील

CD

मुणगे ग्रामपंचायतीकडून माहिती मिळण्यास विलंब
आनंद मालाडकरः कोकण आयुक्तांकडे अपील करण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ३ः मुणगे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या लिखित अहवालाची माहितीच्या अधिकार अंतर्गत मागितलेली माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यास विलंब होत असल्याने ग्रामस्थ आनंद मालाडकर यांनी कोकण आयुक्तांजवळ अपील केले आहे.
मुणगे ग्रामपंचायतीने २७ मे रोजी माहितीचा अधिकार अंतर्गत ग्रामसभेत फक्त मतदारच हजर राहू शकतात, असे ग्रामसभेच्या अजेंड्यावर लिहिले होते. यामुळे जानेवारी ते एप्रिल या कालावधीतील मासिक सभेच्या लिखित अहवालाची माहिती मिळण्यासाठीच्या अनुषंगाने श्री. मालाडकर यांनी 29 सप्टेंबरला देवगड गटविकास अधिकाऱ्यांकडे माहितीचा अधिकार अंतर्गत माहिती मागितली होती. याबाबत ३० सप्टेंबरला देवगड अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक प्रशासन अधिकारी संतोष बिर्जे यांच्यासमोर सुनावणी झाली. तेव्हा माहिती सात दिवसात उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुणगे ग्रामसेविका यांनी लेखी लिहून दिले होते. मात्र, त्यांनी माहिती उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे श्री. मालाडकर यांनी २देवगड गटविकास अधिकाऱ्यांजवळ अर्ज देवून माहिती उपलब्ध करून देण्याची विनंती केली असून राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपिठ कोकणभवन यांच्याजवळ अपिल केले आहे.

कोट
माझ्याकडे मुणगे ग्रामपंचायतीचा प्रभारी कार्यभार होता. माझ्याजवळ हिंदळे ग्रामपंचायत आहे. परंतु, हिंदळे ग्रामस्थानी आपल्या विरुद्ध तक्रार दाखल केली असल्याने मी सात दिवसात माहिती देते म्हणून लिहून दिले आहे. परंतु, चतुर्थीपुर्वीपासूनच मी रजेवर असल्याने मी आनंद मालडकर यांना माहिती उपलब्ध करून देवू शकले नाही.
- मधुरा भुजबळ, ग्रामसेविका

कोट
मुणगे ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र ग्रामसेवक मिळावा, अशी मागणी गेले तीन-चार महिन्यांपासून मी गटविकास अधिकारी यांच्याजवळ केली आहे. परंतु, वर्ष होऊनही स्वतंत्र ग्रामसेवक न मिळाल्याने ग्रामस्थांची सुध्दा गैरसोय होत आहे. ग्रामसेविका यांनी अद्याप रेकॉर्ड पूर्ण केलेले नाही. ती माहिती त्यांना देण्यात यावी, असे सांगितले. परंतु, रेकॉर्ड अपूर्ण असल्याने दुसरा कुठलाही प्रभारी असलेला ग्रामसेवक त्यांना माहिती देवू शकत नाही. नुकत्याच झालेल्या जनता दरबारमध्ये स्वतंत्र ग्रामसेवक कधी मिळणार याबाबत विचारणा केली होती. लवकरच तोडगा काढण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
- अंजली सावंत, सरपंच, मुणगे

कोट
अपीलाप्रमाणे आमच्याकडून निर्णय देण्यात आला आहे. आनंद मालाडकर यांनी मागितलेली माहिती देण्याचे निर्देश संबंधित ग्रामसेविका यांना दिले आहेत.
- संतोष बिर्जे, अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक प्रशासन अधिकारी, देवगड पंचायत समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll Predictions 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? 'एक्झिट पोल'चे धक्कादायक आकडे, ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?

Exit Poll: बंगालमध्ये राजकीय थरार! BJP बहुमताच्या उंबरठ्यावर, TMC ला मोठा फटका; 15 वर्षांनंतर सत्ताबदलाचा भूकंप

Latest Marathi News Live Update: केरळमध्ये आमची बाजू कमकुवत असली तरीही भाजपचेच राज्य येईल - भाजप खासदार मनोज तिवारी

Nandur Sarpanch Election: दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे विशाल थोरात सरपंचपदी विजयी; संतोष बबन बोराटे यांना धक्का

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

SCROLL FOR NEXT