15807
कणकवली रेल्वे स्टेशन रस्त्यांवरील शिल्पकृतींचे उद्घाटन
नगरपंचायतीचा उपक्रम : आमदार नितेश राणेंची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३ : कणकवली नगरपंचायतीच्यावतीने शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्याच्या मध्यभागी विविध दहा शिल्पकृती उभारण्यात आल्या आहेत. याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली रेल्वे स्टेशन रस्ता सुशोभिकरणांतर्गत कणकवली नगरपंचायतीने तीन वर्षा पूर्वी ५० लाख रूपये खर्च करून विविध दहा शिल्पकृती उभारण्याचा निर्णय घेतला होता. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, कणकवली शहराचा दर्जेदार विकास झाला पाहिजे यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे देखील सातत्याने पाठपुरावा करत असतात. आम्ही सातत्याने कणकवली शहराचा दर्जा व विकास कामांसाठी प्रयत्न करत आहोत.
या कार्यक्रमावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजपा अनुसूचित जमातीचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगरसेवक संजय कामतेकर, संदीप नलावडे, किशोर धुमाळे, किशोर राणे अादी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.