

माजी आमदार बच्चू कडू यांचा प्रहार संघटनेसह शिवसेनेत प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेत प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी मंत्री उदय सामंत हेसुद्धा उपस्थित होते. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं होतं. बच्चू कडू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी नंदनवन बंगल्यावर पोहोचले आहेत. बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असलो तरी प्रहार सामाजिक संघटना कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेकडून बच्चू कडू यांनी विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय.