- rat३p३.jpg-
P२४N१५७९४
रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे राष्ट्रनिर्माता पुरस्कार विजेते शिक्षक व क्लबचे सदस्य.
रोटरी क्लबतर्फे ११ शिक्षकांना राष्ट्रनिर्माता पुरस्कार
शैक्षणिक कामाव्यतिरिक्त कार्य ; मोरेश्वर जोशींचा विशेष सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्यावतीने देशाच्या जडणघडणीत प्रगतीच्या कार्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रनिर्माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बीएड् कॉलेज येथे काल (ता. २) ११ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या असिस्टंट गव्हर्नर ॲड. शाल्मली आंबुलकर, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष रूपेश पेडणेकर, सचिव ॲड. मनिष नलावडे, इव्हेंट चेअर पर्सन विनायक हातखंबकर, धरमसी चौहान, कॅ. दिलीप भाटकर, रवींद्र इनामदार, नीलेश मुळ्ये, मंदार सावंतदेसाई, राजेंद्र घाग, श्रीकांत भुर्के आदी उपस्थित होते. या सोहळ्यात प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विविध विषयांत पारंगत व शैक्षणिक कार्यापलीकडे जात अभिमान वाटावा असे कार्य करत सर्वोच्च योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. १०२ वेळा रक्तदान करणारे व कीर लॉ कॉलेजचे मोरेश्वर जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मुग्धा कुळ्ये आणि माधुरी कळंबटे यांनी केले.
------
राष्ट्रनिर्माता पुरस्कार विजेते
डॉ. राजश्री देशपांडे (प्राचार्य बीएड् कॉलेज), बी. के. गोंडाळ (जुवाटी, राजापूर विद्यालय), अंजली पिलणकर (मराठा मंदिर अ. के. देसाई विद्यालय), महेश नवेले (रनपार शाळा), माधव अंकलगे (वरवडे, वाटद विद्यालय), अनुप्रिता आठल्ये (नाचणे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा), राजेश गोसावी (झरेवाडी जिल्हा परिषद शाळा), धनश्री मुसळे (मुख्याध्यापक, बियाणी बालकमंदिर), मिलिंद तेंडुलकर (ग्रंथपाल, महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्था, शिरगाव), रवींद्र जानवेकर (प्राचार्य, आयटीआय मुलींची).
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.