कोकण

विजयजदुर्ग किल्ल्यावर कोकण संस्थेतर्फे स्वच्छता

CD

15839

विजयजदुर्ग किल्ल्यावर कोकण संस्थेतर्फे स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ः कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. २) विजयदुर्ग किल्ला येथे किल्ले साफसफाई आणि जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत शशिकांत कासले, महेश भगत, प्रवीण पेडणेकर यांच्यासह शकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सिंधुदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ल्यांना समाविष्ट करून घेण्याच्या उद्देशाने युनेस्कोची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. किल्ले साफसफाई आणि जनजागृती मोहीम आयोजित करण्याचे उद्दिष्ट म्हणजे शिवरायांनी बांधलेले किल्ले परिसर स्वच्छ असावे आणि आपल्या किल्ल्यांची अधिकाधिक माहिती जनसामान्यांना असावी, असे होते. यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने राज्यातील मराठा लष्करी वास्तूकला युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकनासाठी नामांकन प्रस्ताव सादर केला आहे. सिंधुदुर्ग किल्ले आणि विजयदुर्ग किल्ले या जागतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी युनेस्को टीमची स्थापना करण्यात आली असून, युनेस्को टीम ६ ऑक्टोबरला विजयदुर्ग आणि ७ ऑक्टोबरला सिंधुदुर्गला भेट देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT