कोकण

१४, ८८० शेतकऱ्यांना ४५ कोटी ७२ लाख

CD

जिल्ह्यातील १४ हजार ८८० शेतकऱ्यांना ४५ कोटी ७२ लाख
प्रोत्साहनपर अनुदानः महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अंतर्गत जिल्ह्यातील १४ हजार ८८० शेतकऱ्यांना ४५ कोटी ७२ लाख रक्कमेचा लाभ दिलेला आहे, अशी माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाचे सहकार विभागाच्यावतीने २९ जुलै २०२२ च्या शासन निर्णयानुसार २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षाच्या कालावधीतील कोणत्याही दोन आर्थिक वर्षात अल्पमुदत शेती पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सुरु केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १४ हजार ८८० शेतकऱ्यांना ४५ कोटी ७२ लाख रक्कमेचा लाभ दिला आहे.
प्रोत्साहन पर लाभ योजनेतर्गत राज्यात ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे शासनाच्या ऑगस्ट २०२४ मध्ये निदर्शनास आलेले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये पर्यंतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नव्हता. या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची संधी १२ ऑगस्ट २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत देण्यात आलेली होती. या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या राज्यातील ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४६ किती ७० लाखांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम १ ऑक्टोबर २०२४ ला वर्ग केली आहे. जे शेतकरी आधार प्रमाणीकरण पुर्ण करण्यापुर्वी मृत झाले आहेत, अशांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण व योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षामध्ये कोणत्याही दोन वर्षात बँकेकडून पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेली आहे, अशा राज्यातील एकुण १४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना आजपर्यंत एकुण ५ हजार ३१० कोटी रक्कमेचा लाभ देण्यात आलेला आहे.

चौकट
१ हजार २३० जण लाभापासून वंचित
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अंतर्गत जिल्ह्यातील २३ हजार २५७ शेतकऱ्यांनी लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव केला होता. त्यातील १६ हजार ३९२ जणांची नावे प्रोत्साहन लाभासाठी मंजूर केली आहेत. यातील १६ हजार ३१० जणांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे. ८२ जणांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. आधार प्रमाणीकरण झलेल्यांतील १४ हजार ८८० जणांना लाभ त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे तर एक हजार २३० जणांना अद्याप लाभ मिळालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

भारताच्या प्रगतीचं पाककडून कौतुक! भारत खूप पुढे गेलाय आम्ही मागे आहोत...पाकिस्तानी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

‘मी खूप बदनाम आहे, माझा भूतकाळ सडलेला आहे’ असं का म्हणालेल्या रेखा?

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT