कोकण

विकासकामांच्या निविदा ४ रोजी उघडणार

CD

विकासकामांच्या निविदा आज उघडणार

मुख्याधिकारी हर्षला राणे ः कॉंग्रेस तालुकाध्यक्षांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३ ः लांजा तालुका कॉंग्रेसने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत विकासकामांच्या निविदा उद्या (ता.४) घडण्यात येतील असे लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी सांगितले.
लांजा नगरपंचायतीमार्फत नगरपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या विकास कामांची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा २० जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच विकासकामांची निविदा उघडण्याची अंतिम तारीख २ ऑगस्ट होती. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही नगरपंचायतीमार्फत ही निविदा उघडली गेली नाही. याबाबत तातडीने कार्यवाही करावी अन्यथा या विरोधात २ ऑक्टोबर रोजी आंदोलन करू असा इशारा लांजा तालुका कॉंग्रेसतर्फे देण्यात आला होता. हे निवेदन कॉंग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्ट‌ये, शहराध्यक्ष रवींद्र राणे, तालुका उपाध्यक्ष मकरंद जोशी यांनी दिला होता. या आंदोलनाची दखल घेत लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी कॉंग्रेस पदाधिकाऱ्‍यांना निवेदन दिले आहे. नगरपंचायत कार्यालयातील अभियंतांचे पद रिक्त असल्यामुळे त्यावर कार्यवाही प्रलंबित होती. ३० सप्टेंबर रोजी स्थापत्य अभियंता यतिराज जाधव यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत प्राप्त निविदाधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र निविदाधारकांची वित्तीय बोलीचा लिफाफा ४ ऑक्टोबरपर्यंत उघडण्यात येईल, अशा प्रकारचे पत्र नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT