कोकण

आयडॉलच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके लवकरच मिळणार

CD

‘आयडॉल’च्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके मिळणार

आमदार डावखरे ः डॉ. केळकर यांनी मांडली समस्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : गेले अनेक महिने मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात आयडॉलच्या विद्यार्थ्यांना आपण उत्तीर्ण केलेल्या विषयांचे गुणपत्रक उपलब्ध होत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. या प्रश्नी भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना गुणपत्रके लवकरच मिळतील अशी ग्वाही आमदार डावखरे यांनी दिली आहे.
अनेक वेळा पाठपुरावा करून देखील मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राकडे आयडॉल मुंबईकडून गुणपत्रके पाठवली जात नसल्याने विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप होत होता. काही विद्यार्थ्यांनी दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांच्याकडे धाव घेत हा प्रश्न मांडला. आमदार डावखरे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता डॉ. केळकर यांनी हा प्रश्न जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डावखरे यांच्याकडे मांडला.
या विषयाची तातडीने दखल घेत आमदार डावखरे यांनी थेट मुंबई विद्यापीठ आयडॉल विभागाशी संपर्क साधला. हा विषय त्वरित सोडवून रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रके पाठविण्यात यावी, अशी सूचना केली. या विषयाबद्दल पुढे देखील मी पाठपुरावा करणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रके रत्नागिरी विद्यापीठ उपकेंद्र आयडॉल येथे मिळवून देऊ. तसेच विद्यार्थी-युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे डॉ. ऋषिकेश केळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

Flipkart-Axis Bank ची मोठी घोषणा! कार्ड पेमेंटसाठी आता OTP ची गरज नाही

SCROLL FOR NEXT