शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, व्यवसाय प्रशिक्षण
कोल्हापूर, ता. ३ : शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाची खरेदी-विक्री त्यांनी स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे करावी व त्यातून सगळ्यांचा फायदा व्हावा, या उद्देशाने शेतकरी कंपनी स्थापण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. देशात आजघडीला ४० हजारांहून अधिक एफपीसींची नोंदणी झालेली आहे. नोंदणी पूर्ण होताच कंपनीला सीईओ (किंवा व्यवस्थापक) नियुक्त करणे आवश्यक असते. ती कशी करावी, कंपनीचे व्यवस्थापन, कंपनी व्यावसायिक तत्त्वावर कशी चालवावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारे तीन दिवसीय प्रशिक्षण ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान कोल्हापूर येथे आयोजित केले आहे. प्रशिक्षणात शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, कृषी व्यवसाय मूल्यसाखळी, शेतमाल पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, कर प्रणाली, व्यवसाय आराखडा स्वरूप, बुक कीपिंगचे महत्त्व, शासकीय योजनांची ओळख, या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती इ. बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कृषीसह विविध विद्याशाखांमधून पदवी शिक्षण पूर्ण केलेले पदवीधर, एफपीसीचे संचालक तसेच एफपीसी नोंदणी करू इच्छिणारे शेतकरी यांच्यासाठी हे प्रशिक्षण फायद्याचे आहे.
ठिकाण : १९५५/सी, सोमवार पेठ, महाराणा प्रताप चौक, बसस्थानक समोर, कोल्हापूर
संपर्क : ८४८४८२२३७७, ९३०७६४९०४७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.