कोकण

क्राईम

CD

वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः घरातील देवपूजा करत असताना अचानक अस्वस्थ वाटू लागलेल्या वृद्धाला उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तापासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय बाळकृष्ण देवरूखकर (वय ५९, रा. सोनारवाडी, गणपतीपुळे, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २) सकाळी साडेअकराच्या सुमारास मालगुंड प्राथमिक आरोग्यकेंद्र येथे घडली. देवरूखकर हे सकाळी घरातील देवपूजा करत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
--------
तेलंगणातील वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी ः कन्स्ट्रक्शनचे काम करत असताना अचानक पोट दुखू लागलेल्या तेलंगणा येथील वृद्धाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्यकेंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. इपल्लापल्ली लक्ष्मण (वय ४७, रा. तेलंगणा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २) सायंकाळी सातच्या सुमारास प्राथमिक आरोग्यकेंद्र वाटद-खंडाळा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इपल्लापल्ली यांच्या कामावर असताना अचानक पोटात दुखू लागले. खबर देणार यांनी तत्काळ तेथील कामगाराच्या मदतीने दुचाकीवरून त्यांना प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT