कोकण

-उमेदचे कर्मचारी, महिलांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

CD

-rat३p२९.jpg-
२४N१५९८०
रत्नागिरी ः उमेदच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आदोलन करून जिल्हा परिषद भवनासमोर निदर्शने केली.
-------------

‘उमेद’ कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

कामबंद आंदोलन ; २ हजार ४०० ‘सीआरपीं’चा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्यावी. सर्व कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज उमेदच्या कर्मचारी आणि महिला बचतगटाच्या सीआरपी महिलांनी कामबंद आंदोलन केले. जिल्हा परिषद भवनासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात जिल्ह्यातील २ हजार ४०० सीआरपी महिला व ६८ कर्मचारी सहभागी झाले.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबवण्यात येते. अभियानाच्या माध्यमातून तब्बल तीन हजार अधिकारी व कर्मचारी मागील दहा वर्षापासून कंत्राटी स्वरूपाने काम करत आहेत. या कर्मचार्‍यांनी प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी मोर्चा काढला होता तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्‍यांच्या मागील तीन वर्षापासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासनदरबारी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. यापूर्वी जुलैमध्ये केलेल्या आंदोलनावेळी मुख्यमंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र याबाबत कार्यवाही न झाल्याने उमेदच्या सर्व महिला, कार्यरत केडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचार्‍यांनी पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद भवनासमोर आज आंदोलन करण्यात आले. या वेळी अय्याज फिरजादे, निकिता बोरकर, ऐश्वर्या विचारे, साक्षी वायंगणकर, नयना बोरकर, स्नेहल गावडे, अमेय राजेशिर्के, प्रणव कोळेकर, सुचिता शिंदे, धनश्री आंब्रे, हेमंत मडवी, दीपक मोरे, परमवीर जेजुरकर, अंकिता चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT