N16029
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांबाबत
मालवणात विद्यार्थांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांची माहिती देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या वैभवशाली किल्ले सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करून घेण्याच्या उद्देशाने युनेस्कोची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. त्याआधी शिवरायांनी बांधलेले किल्ले व संपूर्ण परिसर स्वच्छ असावे आणि जिल्ह्यातील किल्ल्यांची अधिकाधिक माहिती विद्यार्थी वर्ग आणि नागरिकांना असावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून शिंदे टोपीवाला हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले इतिहास अभ्यासक म्हणून ओळखले जाणारे ज्योती तोरसकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग किल्यांसह आजूबाजूचे किल्ले व त्यामागचा इतिहास सांगितला. त्यांची स्वच्छता व संवर्धनासाठी जनजागृती व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने काय केले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.
युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यावर किल्ल्यांचे जतन व संवर्धन होण्यासाठी कशा प्रकारे मदत होईल, हे स्पष्ट केले. यावेळी भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. तिवरेसर, पवन बांदेकर, देवेंद्र चव्हाण, कोकण संस्थेचे समन्वयक शशिकांत कासले, सत्यवान भगत, अमोल गुराम, प्रदीप पवार आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सत्यवान भगत, प्रास्ताविक शशिकांत कासले यांनी केले. आभार अमोल गुराम यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.