कोकण

संस्थेतील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीत विसंगती

CD

‘त्या’ कर्मचाऱ्याच्या तक्रारीत विसंगती

पीडितांचा नोंदवणार जबाब ; पोलिसांचा तपास सुरू
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३ ः काही दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील एका वसतिगृहातील मुलींसोबत घडलेल्या कथित गैरप्रकाराची घटना
संस्थेतील एका कर्मचाऱ्याने तक्रारीतून समोर आणली; मात्र त्या तक्रारीतील विसंगत माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे संबंधित पीडित मुलींचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानुसार गुन्ह्यासंबंधी पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यामध्ये तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, गेल्या काही वर्षांपासून मुलींचे वसतिगृह सुरू आहे. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलींसोबत गैरवर्तन होत असल्याची ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली. ही तक्रार संस्थेतील एका कर्मचाऱ्याने दिली होती. प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तक्रारीमध्ये विसंगती समोर आल्याने आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. लवकरच या प्रकरणातील सत्य पोलिस तपासातून स्पष्ट होईल. पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता आजी-माजी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT