कोकण

-खंडाळा एमआयडीसी वादाच्या भोवऱ्यात

CD

-rat३p२७.jpg-
P२४N१५९७०
रत्नागिरी ः खंडाळा एमआयडीसीला विरोध दर्शवत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, स्थानिकांनी प्रांताधिकारी जीवन देसाई यांना निवेदन दिले.
--------------

खंडाळा एमआयडीसी वादाच्या भोवऱ्यात

ग्रामस्थांचा विरोध ; रस्त्यावरची लढाईही लढणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : तालुक्यातील खंडाळा येथील प्रस्तावित एमआयडीसीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध केला आहे. याबाबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था विभाग रत्नागिरी यांच्यामार्फत रत्नागिरी उपविभागीय अधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. न्यायालयीन लढाई व वेळ पडल्यास रस्त्यावरची लढाई लढण्याची भूमिका या वेळी व्यक्त केली.
राज्याच्या उद्योग विभागाने १४ सप्टेंबर २०२४ ला वाटद परिसरातील प्रस्तापित पाच गावांना उद्योगक्षेत्र म्हणून जाहीर केले. लगेचच १५ दिवसात संबंधित शेतकऱ्यांना ३२ /२ खाली जागा संपादित करण्यासाठी नोटीस काढण्यात आल्या. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ यांच्या मनात यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. यामध्ये प्रामुख्याने काही प्रश्न ग्रामस्थांमधून प्रशासनाला विचारण्यात येत आहेत. कोणत्याही प्रकल्पासाठी जागा संपादित करायची असेल तर अधिसूचना काढण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना लेखी सूचना दिली पाहिजे; परंतु तशी कोणतीही सूचना देण्यात आली नाही.या प्रक्रियेत आर्थिक लागेबांधे जपण्यासाठी या जमिनी मोठ्या प्रमाणात दलालांच्या माध्यमातून परप्रांतियांच्या घशात घालून स्थानिकांना देशोधडीला लावण्याचे काम प्रशासन करत आहे का, अशीदेखील चर्चा स्थानिक पातळीवर होत आहे. या जमिनीवर नक्की कोणता प्रकल्प येणार किंवा त्याचे स्वरूप कसे असणार आहे याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आलेला नाही किंवा तशी माहिती संबंधित यंत्रणा द्यायला तयार नाही.
जागेत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून प्रकल्प झाल्यास लोकांना मोठ्या प्रमाणात विस्थापित व्हावे लागेल. प्रशासन त्यांचे पुनर्वसन कशा पद्धतीने करणार आहे० याचेदेखील उत्तर मिळालेले नाही. प्रकल्प आला तर रोजगार निर्माण होईल तर नक्की कोणता रोजगार निर्माण होईल? कारण, अधिकार पदावर येण्यासाठी लागणारी शिक्षणव्यवस्था परिसरात उपलब्ध नाही.
नवीन प्रकल्प येण्यास ग्रामस्थांचा विरोध नाही; मात्र दलालवर्गाला पाठीशी घालून इथल्या जैवविविधतेला, स्थानिक शेतीला आणि जीविताला हानी पोहचवून इथल्या स्थानिक ग्रामस्थांवर जर का प्रशासन हा प्रकल्प थोपवू पाहत असेल तर या प्रकल्पाविरोधात लढण्याची तीव्र व संतप्त भूमिका ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी संस्थेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रथमेश गावणकर, संस्थेचे सचिव केदार चव्हाण, ॲड. महेंद्र मांडवकर व वाटद, मिरवणे, कोळीसरे, कळझोंडी, गडनरळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT