कोकण

रत्नागिरी - दोन महिन्याच्या उचारानंतर ललिता काय अमेरिकेला रवाना

CD

१५९४१


उपचारानंतर ललिता अमेरिकेला रवाना
मनोरुग्णालयाचे आभार ः मुंबईतून आज विमानाने जाणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील जंगलात सापडलेली ती अमेरिकन महिला २ महिने एक दिवस येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेऊन शुक्रवारी अमेरिकेला रवाना होतील. संपूर्ण न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया करून पोलिस बंदोबस्तात सकाळी रेल्वेने त्यांना मुंबईला पाठवण्यात आले. शुक्रवारी (ता. ४) पहाटे मुंबईहून विमानाने ती अमेरिकेला रवाना होणार आहे. अमेरिकन दुतावासाच्या मदतीने तिला व्हिसा देण्यात आला. आई आणि भावाने तिकीट काढल्याने आता ती थेट आपल्या कुटुंबात जाणार आहे. आपल्याला चांगले उपचार आणि मदत मिळाल्याबद्दल तिने येथील आरोग्य विभाग, पोलिस, न्यायालयाचे आभार मानले.
या महिलेला २ ऑगस्टला रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिची प्रकृती आता उत्तम आहे. काही औषधं तिला सोबत दिली असल्याचे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधिकारी डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले. सावंतवाडीतील बांदा पोलिसांनी तेव्हा तिचा ऑन कॅमेरा जबाब घेतला. त्यामध्ये काही भलतीच माहिती पुढे आली. तिच्या मानसिकतेवर परिणाम झाला. आता जगण्यात काही अर्थ नाही या नैराश्येतून तिने रोणापाल सोनुर्लीच्या जंगलात जाऊन स्वतःला डांबून घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले. तिचे लग्नच झालेले नसल्याचे तपासात पुढे आले. आपल्या पतीने आपल्याला या अवस्थेत येथे सोडले, असे या महिलेने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी तामिळनाडूत शोध घेतला. तिने दिलेल्या नावाची कोणतीही व्यक्ती तेथे आढळली नाही. तसेच तिने जो पत्ता दिला होता तेथे घर नसून एक दुकान असल्याचे पुढे आले आहे. त्यांचे कुटुंब साईभक्त असल्याने तिचे नाव ललिता. तमिळनाडू आश्रमात ती मॉडर्न डान्स आणि योगाचे क्लास घ्यायची; परंतु ती आर्थिक अडचणीत आली होती.

कोट...
ललिता काय या अमेरिका महिलेवर रुग्णालयात दोन महिने उपचार केले. आता तिची प्रकृती चांगली आहे. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिस बंदोबस्तात तिला आज अमेरिकेला रवाना केले जाईल. इथे मिळालेले उपचार, सेवा आणि मानसिक आधाराबद्दल तिने यंत्रणांचे आभार व्यक्त केले.
- डॉ. संघमंत्रा फुले, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या प्रादेशिक अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

Akola Crime : ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोल्यात अवैध शस्त्रविक्रीवर धडक; ३ आरोपी अटकेत, २.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

SCROLL FOR NEXT