कोकण

रत्नागिरी ः शिवछत्रपती पुरस्कार

CD

१६०७२
१६०७३

कशेळीतील पूर्वा किनरेला शिवछत्रपती पुरस्कार
रत्नागिरी जिल्ह्याचा बहुमान : पुरस्कारासाठी योगाचा प्रथमच समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : येथील आंतरराष्ट्रीय योगपटू पूर्वा शिवराम किनरे हिला आज शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला. प्रथमच या पुरस्कारासाठी योगाचा समावेश झाला होता आणि पहिला पुरस्कार रत्नागिरीच्या पूर्वा हिने मिळवला आहे. हे पुरस्कार २०२२-२३ या वर्षाचे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पालीजवळच्या कशेळी गावात राहणाऱ्या पूर्वाने योगासन प्रकारात जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे.
येथील क्रीडा कार्यालयात असलेल्या राज्यातील पहिल्या योग क्रीडा केंद्रामध्ये राज्य योग क्रीडा मार्गदर्शक रविभूषण कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तेरा वर्षांपासून ती प्रशिक्षण घेत आहे. अविरत मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर योगासनामध्ये यशाची मोठी उंची गाठली. तिने नुकतेच पनवेल येथील महाविद्यालयात अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. अभ्यासाबरोबरच योगासनातील साधना तिने कायम ठेवली. तिची बहीण प्राप्ती राष्ट्रीय योगापटू आहे. तिने २०१३ मध्ये पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन रौप्य पदके पटकवली आहेत. शासनाच्या आणि संघटनेच्या विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने ३० सुवर्णपदकासह अनेक पदके पटकावली आहेत.
तिचे वडील शिवराम किनरे प्राथमिक शिक्षक आहेत. ते खो-खोचे राष्ट्रीय पंच म्हणूनही काम पाहत होते. तिची आई गृहिणी असून तिने योग प्रशिक्षणामध्ये दोन्ही मुलींचे चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आहे. पूर्वा हिने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवत रत्नागिरी जिल्ह्याची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. शहरासच जिल्ह्यातून आज तिच्यावर कौतुकाचा एकच वर्षाव होत आहे.

कोट
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याचे ऐकल्यानंतर खूप आनंद वाटला. गेल्या अनेक वर्षांची मेहनत फळाला आली. यासाठी प्रशिक्षक, मार्गदर्शक, शिक्षक आणि आई-वडील यांचे मोलाचे योगदान आहे.
- पूर्वा किनरे, योगपटू

योगपटू पूर्वाच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे हे मोठे यश संपादन करता आले. पदके जिंकून तिने राज्याच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ तिला मिळाले. माझी योग प्रशिक्षक म्हणून रत्नागिरीत नियुक्ती झाल्यानंतर सुरू केलेल्या प्रशिक्षण ॲकॅडमीतील ती पहिली खेळाडू आहे.
- रविभूषण कुमठेकर, प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT