सावंतवाडीत आज
शिव स्वराज्य यात्रा
सावंतवाडी ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा उद्या (ता.५) सावंतवाडी गांधी चौक येथे दाखल होत आहे. यानिमित्ताने सकाळी ९.३० वाजता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कहाणी सांगणारे, सध्याच्या राजकीय गोंधळावर भाष्य करणारे तसेच नामांकित कलाकारांचा अभिनय असलेले संतोष पवार दिग्दर्शित ‘वग महाराष्ट्राचा’ हा नाट्यप्रयोग गांधी चौक येथेच यात्रास्थळी होणार आहे. या प्रसंगी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी केले आहे. ‘हक्क मागतोय महाराष्ट्र माझा’ या आशयाखाली हे शिवस्वराज्य यात्रा सावंतवाडीत दाखल होत आहे. नाट्यप्रयोग होताच तातडीने या यात्रेला सुरुवात होणार असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. कोल्हे, युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे आदी त्यांना मार्गदर्शन करणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आदींची उपस्थिती असेल.
---
बांदा येथे उद्या
ज्येष्ठ नागरिक मेळावा
सावंतवाडी ः जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी, बांदा या संस्थेने रविवारी (ता.६) सायंकाळी ४ वाजता बांदा ग्रामपंचायत सभागृहात बांदा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिक सभासदांचा आणि पंचक्रोशीतील विशेष प्रावीण्य व सन्मान प्राप्त व्यक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक (महाराष्ट्र राज्य) पुरस्कार प्राप्त जे. डी. पाटील व राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल नीलेश मोरजकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ७५ वर्षे पूर्ण झालेले सुभाष नाईक, महादेव मोर्ये, वसंत हरमलकर, शरदचंद्र महाबळ, पुंडलिक बांदेकर, याकुब आगा, रामदास कळंगुटकर, अनंत देसाई, सुभाष राऊळ, दत्ताराम देसाई, तुकाराम मोरजकर, जयवंत बांदेकर, शिवराम सावंत, रामचंद्र देसाई, प्रमोद अळवणी, गुंडू सातोस्कर, श्रीमती नजमा खान, श्रीमती गीता बांदेकर, गुंडू सावंत, मनोहर नाईक, एकनाथ सावंत, सुभाष महाजन आदींचा सन्मान करण्यात येईल. कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी, बांदाचे अध्यक्ष अन्वर खान व सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी केले आहे.
----------------------
‘घे भरारी’तर्फे उद्या
‘गरबा नाईट’ कार्यक्रम
सावंतवाडी ः शहरातील ‘घे भरारी फाउंडेशन’तर्फे महिलांसाठी येथील आर. पी. डी. हायस्कूलच्या पटांगणावर उद्या (ता.५) सायंकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत ‘गरबा नाईट’चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी बेस्ट डान्सर, बेस्ट कॉस्च्युम, बेस्ट हेअरस्टाईल, बेस्ट एनर्जेटिक परफॉर्मन्स आदी बक्षिसे आहेत. उपस्थित रसिक प्रेक्षकांसाठीही लकी ड्रॉ कूपन असून यातून प्रथम पारितोषिक सोन्याची नथ, द्वितीय १ ग्रॅम सोन्याचा नेकलेस सेट व तृतीय मोत्यांचा हार व इतर आकर्षक गिफ्ट आहेत. या कार्यक्रम महिला व मुलींसाठी मोफत आहे. जास्तीत जास्त गरबा मंडळांनी तसेच प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन ‘घे भरारी फाउंडेशन’च्या संस्थापक अध्यक्षा मोहिनी मडगावकर, अध्यक्षा गीता सावंत, उपाध्यक्षा शारदा गुरव, सचिव मेघना राऊळ, खजिनदार मेघना साळगांवकर तसेच कार्याध्यक्षा रिया रेडीज यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.