वेसवी अंगणवाडीत राष्ट्रीय पोषण सप्ताह
विविध उपक्रम ; आरोग्यविषयी जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत वेसवी अंगणवाडी केंद्र येथे राष्ट्रीय पोषण महासप्ताह साजरा करण्यात आला. २०१८ पासून पूर्ण देशातील अंगणवाड्यात दरवर्षी हा महिना साजरा करण्यात येतो. गरोदर माता, किशोरवयीन मुली, स्तनदा माता, बालके यांचे पोषण नीटपणे होण्यासाठी सप्टेंबर हा महिना पोषण महा म्हणून साजरा करण्यात आला.
बालमृत्यू रोखणे व किशोरवयीन मुलींमधील अॅनिमियाचे प्रमाण कमी करणे, पुढील जन्माला येणारी पिढी सक्षम व सुदृढ बालके जन्माला यावीत या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात वेसवी, नांदगाव अंगणवाडीही सहभागी झाली. एक पेड माँ के नाम, पोषण अभियान फेरी, पोषण आहार बैठक, पोषण आहार मार्गदर्शन, बेटी बचाओ बेटी पढाओ, पोषण आहार अभियान जनजागृती, महिला आयुष्य योग, संयुक्त बैठक, बचतगट माहिती, बालकांचे १ हजार दिवस पोषण वाटिका, किशोरवयीन मुलींचा आहार, पावसाळ्या परिसरात उपलब्ध १८ भाज्यांची माहिती देण्यात आली. यातून शरीराला मिळणारे पोषण घटक तसेच आहार, आरोग्य स्वच्छताविषयक माहिती अंगणवाडी सेविका शलाका पवार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.