कोकण

फुलपाखरू महोत्सवाचे पारपोलीत उद्‍घाटन

CD

16342

फुलपाखरू महोत्सवाचे पारपोलीत उद्‍घाटन

जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती; पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः सिंधूरत्न योजनेअंतर्गत वनविभागाने पारपोली गावात फुलपाखरू महोत्सवाचे दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले.
यावेळी माजी आमदार राजन तेली, राजन पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, पारपोली उपसरपंच संदेश गुरव, सरपंच लक्ष्‍मण नाईक, उप वनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, आंबोली वनक्षेत्रपाल अमित कटके, वनपाल नाईकवडी तसेच पारपोली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाकडून फुलपाखरांचे गाव म्हणून पारपोली गावाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर वनविभागाद्वारे अनेक सोयी सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात येत असून या गावात जवळपास १८० प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळून येतात. या प्रजातीचा ऑक्टोबर ते जानेवारी हा त्यांचा जीवनकाळ असल्याने या काळात मोठ्या प्रमाणात आढळतात. यावर्षीच्या हंगामात सलग चार महिने फुलपाखरू दर्शनाची निसर्ग भ्रमंती सुरू ठेवण्यात येणार आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या राहण्याची सोय गावातच करण्यात आली असून यासाठी लागणाऱ्या सुविधा वनविभागाकडून तर निवास व्यवस्था ग्रामस्थांना करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पाटील यांनी वनविभाग सातत्याने राबवत असलेल्या फुलपाखरू महोत्सवाचे कौतुक केले तसेच भविष्यातील असे उपक्रम राबवण्यास आपले सदैव सहकार्य राहील, असे स्पष्ट केले. उप वनसंरक्षक रेड्डी यांनी गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या फुलपाखरू महोत्सवातून अनेक पर्यटक जोडले गेले आहेत. आताही असेच पर्यटक येतील, असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heatwave Alert : महाराष्ट्रात उन्हामुळे अलर्ट! कामगारांना दुपारी १२ ते ४ या वेळेत सक्तीची विश्रांती; शासनाची SOP काय?

Crime: मांजर-बोक्याचं झेंगाट; ४ पिल्लांच्या जन्मामुळे मालकांमध्ये युद्ध पेटलं, मालकिनीनं शेजारच्यावर माऊला फेकलं अन्...

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

CBSE Class 10 Result 2026 OUT! तुमचा 10वीचा निकाल कसा पाहायचा? स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

SCROLL FOR NEXT