कोकण

वृद्धाश्रमातील महिलांसोबत आनंददायी संध्याकाळ

CD

काही सुखद---लोगो


-rat४p३२.jpg-
P२४N१६३३७
पावस ः पावस येथील आनंदी अनुसया महिला वृद्धाश्रमामध्ये मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजने ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंद साजरा केला.
-----------

वृद्धाश्रमात आनंददायी संध्याकाळ

‘फिनोलेक्स’ची बांधिलकी ; भजनाचा आनंद
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ४ ः मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजने आपल्या सामाजिक बांधिलकीतून वृद्धाश्रमांसाठी किराणा माल, आरोग्य तपासणी, त्यांना लागणारी फिजिओथेरपी, त्यासाठीचे उपकरण पुरवून सकारात्मक कार्य चालू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय वृद्धदिनानिमित्त रत्नागिरीतील पावस येथील आनंदी अनुसया वृद्धाश्रमात १५ ज्येष्ठ नागरिकांसोबत व सहकाऱ्यांबरोबर आनंददायी संध्याकाळ घालवण्यात आली.
संध्याकाळची सुरवात एका मनोरंजक भजनाने करण्यात आली. त्यामुळे सर्व ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद दिसला. हा सोहळा साजरा करण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याने ज्येष्ठ नागरिक आनंदित झाले. सर्वांनी भजनाच्या कार्यक्रमाचा आणि नाश्त्याचा मनापासून आस्वाद घेतल्याने उत्साहाचे वातावरण होते. मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रतिनिधी या अद्भुत उत्सवाचा एक भाग होते.
मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या सामाजिक बांधिलकीतून गेली काही वर्षे रत्नागिरीमधील स्वगृही वृद्धाश्रम, अरूणाश्रम लांजा, आनंदघर यांसारख्या वृद्धाश्रमांना मासिक किराणा सामान, सोलरलाइट सिस्टिम, फिजिओथेरपी सेशन, ऑर्थोटिक उपकरणांसह सक्रियपणे मदत करत आहेत. या कार्यक्रमाचे ज्येष्ठ नागरिक व व्यवस्थापनाने मनापासून कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुन्हेगारासोबत खाकीची दोस्ती? आरोपी अयानला पोलीसच भरवतायत केक; लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हिडिओमुळे खळबळ

Ayodhya: राम मंदिरात पुजारी व्हायचंय? रामललाची सेवा करण्याची मोठी संधी; जाणून घ्या वयोमर्यादा, शिक्षण आणि निवडीचे कडक नियम!

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधीच सोनं स्वस्त! भाव आजून वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

Electric Shock Death : साकोरा हादरलं! वीज पंप सुरू करताना दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत; एकाच्या मुलीचं लग्न, तर दुसऱ्यानं यापूर्वीही सोसलेलं नियतीचं चक्र

'मला बाळ हवय, तु फक्त स्पर्म डोनेट कर' राकेश बापटच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली राखी, म्हणाली...'माझं त्यांच्यावर खरंच मनापासून...'

SCROLL FOR NEXT