कोकण

रत्नागिरी-खेडशी सरपंचपदी शिवसेनेचे आबा बंडबे विजयी

CD

16338

खेडशी सरपंचपदी
शिवसेनेचे वसंत बंडबे
मानसी पेडणेकर यांचा पराभव
रत्नागिरी, ता. ४ : तालुक्यातील खेडशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वसंत उर्फ आबा सोमा बंडबे यांनी ९ विरुद्ध ४ मतांनी प्रभारी सरपंच मानसी मंगेश पेडणेकर यांचा दारूण पराभव केला. पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्नचे सदस्य किरण उर्फ भय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख बाबू म्हाप व त्यांच्या सहकाऱ्यांनी खेडशी ग्रामपंचायतीवर पुन्हा भगवा फडकावला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील या मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेने कायम ठेवत ठाकरे शिवसेना गटाला धोबीपछाड दिला. खेडशी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जान्हवी घाणेकर यांनी अडीच वर्षानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. या पदाचा कारभार प्रभारी सरपंच म्हणून उपसरपंच मानसी पेडणेकर या पाहात होत्या. आज या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक प्रशासनाने जाहीर केली होती. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार रिद्धी गौरे यांनी काम पाहिले. शिवसेनेकडून ज्येष्ठ सदस्य वसंत उर्फ आबा सोमा बंडबे हे सरपंचपदासाठी रिंगणात उतरले होते. उबाठाकडून मानसी पेडणेकर या रिंगणात होत्या. दुपारी नऊ सदस्यांनी आबा बंडबे यांना मतदान केले तर मानसी पेडणेकर यांच्या पारड्यात चार सदस्यांनी मते टाकली. खेडशी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या नावाने जयघोषणा करण्यात आला. या वेळी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, तालुका संघटक भिकाजी गावडे, विभागप्रमुख प्रकाश रसाळ, प्रवीण पवार, युवासेना विभागप्रमुख हर्षराज पाटील, उपविभागप्रमुख पिंट्या साळवी, रमेश कसबेकर, प्रथमेश पाटील यांनी सरपंचांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT