- ratchl४६.jpg
२४N१६३५७
ः चिपळूण ः जल्लोष लोककला महोत्सव निमित्ताने शहरातून काढण्यात आलेली छोट्या कलाकारांची दिंडी.
-----------
नव्या पिढी पर्यंत लोककला पोहचवा
नीलम शिर्के ः चिपळूण येथे बालनाट्य स्पर्धा सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ः बाल रंगभूमी परिषद मुंबईच्यावतीने जल्लोष लोककलेचा हा लोककलांवर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रम चिपळूण येथे होत आहे. लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, त्यांनी त्या जपाव्यात अशी यामागची भावना आहे, असे प्रतिपादन बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्षा, अभिनेत्री निलम शिर्के यांनी केले.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस बालनाट्य परिषद चिपळूणच्या सहकार्याने जल्लोष लोककला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचे निलम शिर्के यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.
रंगभूमी परिषद लहान मुलांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी काम करत आहे. वेगवेगळ्या भागात लोककला महोत्सव होत आहेत. लहान मुले मोबाईलमध्ये अडकत चालली आहेत. त्यांना यातून बाहेर काढून लोककलांची जाणीव व्हावी असा परिषदेचा उद्देश आहे. लवकरच रत्नागिरीमध्ये विशेष विद्यार्थ्यांसाठी कला महोत्सव होत आहे. यानंतर व्यावसायिक स्वरूपाची बालनाट्य स्पर्धाही होणार आहे. स्पर्धक म्हणून प्रेक्षक म्हणून जोडलेला प्रत्येक विद्यार्थी बालरंगभूमीचा सदस्य आहे, असे शिर्के यांनी सांगितले. तत्पूर्वी लोककलावंत योगेश बांडागळे, राजेश गोसावी, प्रकाश गांधी आदींनी नमनातील पहिलं नमन सादर करून कार्यक्रमाची सुरवात झाली. योगेश बांडागळे यांनी आपल्या खास संगमेश्वरी बोलीत गाऱ्हाणे घातले. अभिनेते नंदू जुवेकर यांनी लोककला महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. दिंडीने या लोककला महोत्सवाचा सकाळी साडेआठ वाजता प्रारंभ झाला. नटराजाची मूर्ती असलेली पालखी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली. शहरातील विविध शाळा, विविध संस्थांचे प्रतिनिधी यांनीही यामध्ये सहभाग नोंदवला. आज शनिवारी या लोककला महोत्सवाची सांगता होणार आहे.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.