कोकण

केसरकर सोडून कोणाचाही प्रचार

CD

16364

केसरकर सोडून कोणाचाही प्रचार

राजन तेली ः आजपर्यंतच्या घोषणा प्रत्यक्षात न आल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः मंत्री दीपक केसरकर यांनी आजपर्यंत केवळ घोषणाच केल्या आहेत. त्यामुळे महायुतीतून त्यांना सोडून कोणालाही तिकीट द्या. मी प्रचार करायला तयार असल्याचे वरिष्ठांना सांगितल्याची माहिती माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिली. केसरकर यांच्या घोषणा या जादूच्या कांडीप्रमाणे आहेत. ते स्वार्थासाठी जनतेला फसवून आमदार झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
श्री. तेली यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आडळी येथे एमआयडीसी सुरू करण्याबाबत केसरकर यांनी काल (ता.३) पुन्हा एकदा घोषणा केली. मात्र, त्यांच्या या घोषणा निवडणुका जवळ आल्या की नेहमीच पाहायला मिळतात. त्यांच्या या भूमिकेला माझा विरोध असून त्यांनी एक तरी उद्योग त्या ठिकाणी सुरू करून दाखवावा. मी स्वतः त्यांचे स्वागत करेन. केवळ घोषणा करायच्या आणि जनतेला वाऱ्यावर सोडायचे, हेच आजपर्यंत केसरकर करत आले आहेत. माटणे येथे एमआयडीसीसाठी जागा ठेवण्यात आल्याचे त्यांनी काल सांगितले. परंतु, तेथील सरपंचांना तलाव सुशोभीकरणासाठी त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत. आज माटणेसह पंचक्रोशीतील जनतेची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. याकडे त्यांनी कधीच लक्ष दिला नाही. तेथील लोकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. बेळगाव येथे ताज हॉटेलसाठी लोकांनी कवडीमोल दराने जमिनी देऊनही तीस वर्षे त्या ठिकाणी प्रकल्प होऊ शकला नाही. केवळ लोकांना आश्वासने देऊन दरवेळी त्यांनी आमदारकी पदरात पाडून घेतली आहे. आज सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी संदर्भात दोन दिवसात सह्या नाही झाल्यास मल्टीस्पेशालिटी दुसऱ्या जागी स्थलांतरित करण्याचे ते सांगत आहेत. एकूणच जनतेची ते दिशाभूल करत आहेत. वेत्ये येथे जागा असतानाही त्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी का केले नाही० केवळ जनतेची चेष्टा करायची हाच उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केसरकरांना जनतेने आमदार म्हणून निवडून दिल्यास मतदारसंघ विकासात अजून मागे जाईल.’’
श्री. तेली पुढे म्हणाले, ‘‘विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी मी इच्छुक आहे. तशा प्रकारची मागणीही मी वरिष्ठांकडे केली आहे. परंतु, युतीचा धर्म लक्षात घेता त्या ठिकाणी केसरकर यांना पुन्हा संधी देऊ नका. त्यांच्या बदल्यात या ठिकाणी कोणीही उमेदवार दिल्यास मी त्यांचा प्रचार करण्यास तयार आहे, अशी मागणी मी वरिष्ठांकडे केलेली आहे. याबाबत येत्या आठ दिवसात निश्चितच निर्णय होईल. वरिष्ठ पातळीवर तुम्ही युती करत असताना स्थानिक पातळीवर माझ्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी कोणासोबतही फरफटत जायचे का० याचाही विचार वरिष्ठांनी करावा, असेही मी सांगितले आहे.’’
--------------------------
‘सिंधूरत्न’ची चौकशी व्हावी
शासनाची योजना असतानाही केसरकर यांनी वाटेल त्याला सिंधूरत्नमधून ट्रान्सफॉर्मर वाटले आहेत. कासार्डे या ठिकाणी मायनिंगसारख्या प्रकल्पासाठी एका बिल्डरला २९ लाख रुपये किमतीचा ट्रान्सफॉर्मर दिला आहे. या सर्व प्रकारामागे वेंगुर्ले येथील एका खलनायकाचा सहभाग असून तो खलनायक कोण० यासह या योजनेच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणीही श्री. तेली यांनी पत्रकार परिषदेतून केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

SCROLL FOR NEXT