16458
डॉ. अभय परब यांना नियुक्ती पत्र
आचरा ः मालवण तालुक्यात आरोग्य सेवा देणे एवढाच उद्देश न ठेवता समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने आरोग्य सेवेसोबतच सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण याबाबतही योगदान द्यावे, या उद्देशाने तालुक्यातील डॉक्टरांनी एकत्र येत ‘रॉयल मालवणी’ संस्था स्थापन केली. या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. अभय परब, उपाध्यक्षपदी डॉ. सिद्धू सकपाळ यांची निवड करण्यात आली. यासाठी डॉ. विवेक रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या इतर कार्यकारिणीत सचिव डॉ. अमोल हुले, खजिनदार डॉ. स्वप्नील भोगटे, सल्लागार डॉ. नसीर पटवेलकर, डॉ. राहूल वझे, सदस्यपदी डॉ. सुनील साळुंखे, डॉ. राहुल चिंदरकर, डॉ. रोहित डगरे, डॉ. प्रथमेश वालावलकर, डॉ. हर्षद पवार, डॉ. धनंजय सावंत, डॉ. धनंजय आचरेकर यांची निवड झाली. वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, पशुसंवर्धन, पर्यावरणपूरक अशी अनेक उद्दिष्टे घेऊन ही संस्था काम करणार आहे. जिल्ह्यात नर्सिंग कॉलेज व्हावे आणि त्यातून आरोग्यसेवेला अजून उभारी मिळावी या आणि अशा अनेक उपक्रम घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डॉ. परब यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.