16459
कुणकेश्वरचा समर्थ ग्रुप प्रथम
आचरा ः इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे चौघड्यावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सवानिमित्ताने श्री बाळगोपाळ मंडळ आचरा-वरचीचावडी आयोजित जिल्हास्तरीय दांडिया स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत समर्थ ग्रुप कुणकेश्वर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय नवदुर्गा ग्रुप किंजवडे, तृतीय आचरा-पिरावाडी, उत्तेजनार्थ सिद्धिविनायक ग्रुप नांदगाव, कुणकेश्वर पावणाई, वेंगुर्ले, नाडण-देवगड यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण मनस्वी कुबल, सागर सारंग यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण देवस्थान सचिव संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, मंडळाचे अध्यक्ष विलास आचरेकर, उपाध्यक्ष किशोर आचरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी वामन आचरेकर, बबन शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, महेश शटये, रामदास आचरेकर, मंदार आचरेकर आदी उपस्थित होते. राजेश भिरवंडेकर आणि राजा सामंत यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.