16463
कासार्डे कॉलेजच्या विद्यार्थिनी
खो-खो स्पर्धेमध्ये विजेत्या
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ५ ः क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघाची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
क्रीडा कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान झाली. या स्पर्धेत कासार्डे कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघात समीक्षा पाळेकर, दिव्या पाळेकर, क्षितिजा काळे, नेहा कदम, रुचिता पाळेकर, संजीवनी सावंत, रिद्धी पाळेकर, सिद्धी पाळेकर, प्राची परब, भाविका पाळेकर, सानिया पाळेकर, तृप्ती पाळेकर, कस्तुरी पाळेकर, अनुष्का पाळेकर, प्रेरणा गाडे आदी खेळाडूंनी समावेश होता. या खेळाडूंना विद्यालयाचे शिक्षक प्रा. दिवाकर पवार, प्रा. ममता डांगमोडेकर, प्रा. विनायक पाताडे, नवनाथ कानकेकर, वैष्णवी डंबे, क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड आदींचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे, शाळा समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे आदींनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.